Team MyPuneCity – पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिची हत्या (Kondiwade Murder) केली. ही घटना शुक्रवारी (२३) सकाळी मावळ तालुक्यातील कोंडीवडे (आंदर मावळ) येथे घडली.
सोनाबाई अशोक वाघमारे (३३, कोंडीवडे (अ मा), मावळ) असे खून (Kondiwade Murder) झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मारुती काळुराम पवार (५०, कोंडीवडे (अ मा), मावळ) यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अशोक बारकू वाघमारे (कोंडीवडे, आंदर मावळ) याला अटक करण्यात आली आहे.
मारुती पवार यांची मुलगी सोनाबाई आणि जावई अशोक वाघमारे हे पवार यांच्याच गावात राहत होते. अशोक हा पत्नी सोनाबाई यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना सतत शिवीगाळ आणि मारहाण करत होता. शुक्रवारी सकाळी दोघे पती पत्नी मासेमारी करण्यासाठी जात होते. कोंडीवडे (अ मा) गावालगत असलेल्या वनविभागाच्या जागेत गेल्यानंतर अशोक याने सोनाबाई यांच्यावर हल्ला करून त्यांचा खून (Kondiwade Murder) केला. वडगाव मावळ पोलीस तपास करीत आहेत.