Team My Pune City – घरात घुसून एका कुरियरवाल्याने तरुणीवर बलात्कार केल्याने पुण्यात चांगलीच खळबळ माजली होती. मात्र आता तो कुरिअर बॉय नसून तिचा मित्रच असल्याचे समोर आले आहे.त्यामुळे पोलिसांनी पीडितेला च चौकशीसाठी ताब्यात ( Kondhwa rape case ) घेतले आहे.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तब्बल 500 पोलिसांचा फौजफाटा तपासासाठी पाठवला होता. यावेळी एका संशयिताचा फोटो पोलिसांनी पीडितेला दाखवला. यावेळी पीडिता थोडी गोंधळली आणि पोलिसांना संशय आला. सखोल तपास केला असता तो तरुण कुरिअर बॉय नसून तिचा मित्रच असल्याचे समोर आले आहे.
पीडित तरुणीच्या कॅमेऱ्यात छायाचित्र सापडले होते. ते छायाचित्र तिने एका अॅपचा वापर करून ‘एडिट’ करून तरुणीने हा संदेश स्वतःच्या मोबाइलवर घेतल्याचे आढळले.
हा संपूर्ण वाद शरीरसंबंध ठेवण्यावरून झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. मात्र मुलीने आपल्याच मित्रा विरोधात पोलिसात तक्रार का दिली हे कोडे अजून पोलिसांना सुटलेले नाही.
याविषयी बोलताना पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की,पोलिस अद्याप कोणत्याच निकषावर पोहोचले नाहीत. पीडितेचे सध्या समुपदेशन सुरू असून सत्य लवकरच ( Kondhwa rape case ) समोर येईल असे त्यांनी स्पष्ट केले.