Team My Pune City – कोंढवा परिसरातील( Kondhwa Crime News) मिठानगर भागात हत्याराने दुकानाची तोडफोड करत स्थानिक व्यापारी व नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या तिघा तरुणांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.
Kothrud Crime News : कोथरूडमध्ये घरफोडी; आठ लाख दहा हजारांचा ऐवज चोरीला
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे हामजा खान (वय २०), फिदा खान (वय २०) आणि शाहरुख शेख (वय १८) अशी आहेत. त्यांचे काही साथीदार सध्या फरार असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तक्रार समीर मोहम्मद युसुफ शेख (वय ४७, रा. मिठानगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात दिली(Kondhwa Crime News) आहे.
Nakul Bhoir Murder : घरगुती कलहातून सामाजिक कार्यकर्ता नकुल भोईर यांचा पत्नीने केला खून
वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आरोपी हत्यारे हातात घेऊन मिठानगर भागात आले. त्यांनी परिसरातील काही दुकाने लक्ष्य करत मोठ्या आवाजात आरडाओरड केली. त्यानंतर त्यांनी एका चिकन दुकानाचा एलईडी बोर्ड फोडला, तसेच भंगार दुकानाबाहेर ठेवलेला टीव्ही सेट तोडून टाकला. आरोपींच्या या कृतीमुळे परिसरातील दुकानदार व रहिवासी भयभीत झाले (Kondhwa Crime News) व त्यांनी तत्काळ दुकाने बंद करून घेतली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघा आरोपींना अटक केली असून त्यांचे काही साथीदार फरार झाले आहेत. पोलिसांकडून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
या प्रकरणी (मालमत्तेची तोडफोड), धमकी देणे आणि सार्वजनिक शांततेचा भंग या कलमांनुसार संबंधित तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खारडे कोणधवा पोलीस ठाणे करत आहेत.
या घटनेमुळे मिठानगर परिसरात तणावाचे वातावरण असून, पोलिसांनी नागरिकांना अफवा न पसरविण्याचे व सहकार्य करण्याचे आवाहन केले (Kondhwa Crime News) आहे.


















