Team My Pune City – विसर्जन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला नाना पेठेत झालेल्या टोळीयुद्धात आयुष कोमकर( Komkar murder case) याच्यावर गोळीबार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणी आंदेकर टोळीतील शिवम आंदेकरसह चौघांना गुजरात सीमेवरून अटक करण्यात आली आहे. तर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याचा मुलगा कृष्णा आंदेकर अद्याप फरार असून, त्याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.
Heavy Rain Pune : पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट; पुढील तासांत मुसळधार पावसाचा इशारा
गुन्हे शाखेच्या तपासात आंदेकर टोळीतील पुतणे व कुटुंबीय गुजरातकडे( Komkar murder case) पसार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत शनिवारी सायंकाळी महाराष्ट्र-गुजरात सीमेवरून चौघांना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांची नावे शिवम उदयकांत आंदेकर (वय ३१)अभिषेक उदयकांत आंदेकर (वय २१) शिवराज उदयकांत आंदेकर (वय २९),माजी नगरसेविका लक्ष्मी उदयकांत आंदेकर (वय ६०, सर्व रा. नाना पेठ) अटक झालेल्या चौघांना गुजरातमधील स्थानिक न्यायालयाकडून प्रवासी कोठडी मिळवून सोमवारी (दि 15) पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
Rashi Bhavishya 15 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
आत्ता पर्यंत आयुष उर्फ आयुष कोमकर खून प्रकरणी ( Komkar murder case) आधीच आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडूअण्णा आंदेकर (वय ७०), नातू तुषार नीलंजय वाडेकर (२७), स्वराज नीलंजय वाडेकर (२३), विवाहित मुलगी वृंदावनी वाडेकर (४०), तसेच अमन युसुफ पठाण (२५), यश सिद्धेश्वर पाटील (१९), अमित प्रकाश पाटोळे (१९), सुजल राहुल मेरगु (२०, भवानी पेठ) यांना अटक झाली आहे.तसेच बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा उर्फ कृष्णराज आंदेकर (वय ४०) हा अजूनही फरार असून, त्याच्या मागावर गुन्हे शाखेची पथके आहेत.
या प्रकरणी एकूण १३ आरोपींवर मकोका कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी आंदेकर कुटुंबातील घरी छापे टाकून ७७ तोळे सोन्याचे दागिने, अडीच लाख रुपये रोकड, जमीन व्यवहारातील कागदपत्रे, करारनामे आणि एक मोटार जप्त केली ( Komkar murder case) आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे, तसेच सहायक आयुक्त राजेंद्र मुळीकर व शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
“आयुष कोमकर खून प्रकरणात फरार असलेल्या आंदेकर टोळीतील चौघांना गुजरात सीमेवरून ताब्यात घेण्यात आले आहे. अजून एक आरोपी फरार असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. आरोपींना पुण्यातील विशेष न्यायालयात हजर करण्यात ( Komkar murder case) येणार आहे,”
– निखिल पिंगळे, उपायुक्त, गुन्हे शाखा.