Team My Pune City – रांजणगाव MIDC परिसरात घडलेल्या ( Kidnapping) धक्कादायक अपहरण प्रकरणात रांजणगाव MIDC पोलिसांनी केवळ दोन दिवसांत तपासाची गती वाढवत पंजाब राज्यातील लुधीयाना येथून अपहृत मुलाची सुखरुप सुटका केली आहे. या प्रकरणी अपहरण करणारे परप्रांतीय दांपत्य पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Durga Mata Doud : तळेगावमध्ये दुर्गा माता दौडचे आयोजन
मिळालेल्या माहितीनुसार, कारेगाव येथील औद्योगिक वसाहतीत कामानिमित्त वास्तव्यास असलेल्या सौ. काजल महेंद्र पडघाण (मूळ रा. वाशिम) या आपल्या तीन वर्षांच्या मुलगा आयुषची देखरेख( Kidnapping) करण्यासाठी शेजारी राहणाऱ्या परप्रांतीय दांपत्याकडे सोपवत असत. हे दांपत्य म्हणजे पुजादेवी उर्फ वनिता अर्जुन यादव (रा. बिहार) व तिचा पती अर्जुनकुमार यादव. 12 सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे आयुषला देखरेखीसाठी पुजादेवीकडे दिल्यानंतर संध्याकाळी काजल पडघाण घरी परतल्या असता मुलगा व दांपत्य दोघेही गायब होते. मोबाईलही बंद मिळाल्याने व शेजाऱ्यांच्या मदतीनंतरही काहीच माहिती न मिळाल्याने अखेर 15 सप्टेंबर रोजी रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक संदीप गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे व उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने तपास सुरू केला. सुरुवातीला आरोपी बिहारला गेल्याची शक्यता वर्तवण्यात आली, मात्र तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी लुधीयाना (पंजाब) येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पीएसआय अविनाश थोरात व पोलीस कर्मचारी दत्तात्रय शिंदे यांचे पथक तातडीने पंजाबला रवाना ( Kidnapping) करण्यात आले.
Pune: कॅनव्हासवर उमटली देवी अहिल्यांची शिवभक्ती आणि १०० वर्षांपूर्वीच्या महाकुंभाचे वैभव
स्थानिक पोलिसांच्या मदतीने रांजणगाव MIDC तपास पथकाने लुधीयाना येथे छापा टाकून पुजादेवी यादव (37) व अर्जुन यादव (36) या दांपत्याला ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून अपहृत मुलगा आयुषची सुखरुप सुटका करण्यात आली. 17 सप्टेंबर रोजी तपास पथक मुलाला घेऊन रांजणगावला परतले. पोलिसांनी आरोपींना सकाळी 8.48 वाजता अटक करून न्यायालयात हजर केले. तपासादरम्यान आरोपींनी कबुली दिली की, त्यांना मूलबाळ नसल्यामुळे मुलाचा लळा ( Kidnapping) लागून त्यांनी हे कृत्य केले.
अपहृत मुलगा आईकडे परतल्यावर काजल पडघाण यांना आनंदाश्रू अनावर झाले. नातेवाईक, शेजारी व ग्रामस्थांनी पोलिसांचे आभार मानले.
ही धाडसी कारवाई पोलिस अधीक्षक संदीप गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, पीएसआय अविनाश थोरात, पोलीस कर्मचारी दत्तात्रय शिंदे, उमेश कुतवळ, विजय सरजिने, सायबर सेलचे संकेत जाधव तसेच पंजाब पोलिस निरीक्षक सुरेशकुमार रामल व गुरमित सिंग यांच्या सहकार्याने पार पडली. प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक चव्हाण करीत ( Kidnapping) आहेत.





















