Team My Pune City – भिवेगाव (ता. खेड) येथील (Khed)गर्द राई मध्ये असलेला प्रसिद्ध देवकुंड धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. चाकण आणि परिसरातून चौघे मित्र धबधबा पाहण्यासाठी राजगुरू मार्गे भोरगिरी येथे आले होते.
PCMC: शाडू मातीच्या गणेश मूर्तींना नदी विसर्जनाची परवानगी द्यावी – माजी नगरसेवक विजय शिंदे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
Lonavala:घरगुती गॅस टाकी चोरणारा चोरटा झाला गजाआड
भिवेगाव जवळ देवकुंड धबधबा पाहण्यासाठी त्यांनी स्थानिक गाईड दिलीप लक्ष्मण वनघरे (वय 33) याला बरोबर घेतले. धबधबा पाहत असताना दिलीप वनघरे मोबाईलवर त्यांचे फोटो घेत होता. दुर्दैवाने चाकण येथील सुबोध कारंडे (वय 25) याचा तोल जाऊन तो धबधब्यात पडत असताना दिलीप कारंडे यांनी त्याला वाचवण्यासाठी हात दिला. परंतु सुबोधने दिलीपलाच मिठी मारल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. स्थानिक पोलीस पाटील संतोष वनघरे व बाजार समितीचे उपसभापती विठ्ठल वनघरे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढले. राजगुरुनगर पोलीस स्टेशनचे पोलीस पंचनामा करत आहेत .