Team MyPuneCity – सावकारी परवाना नसताना व्याजाने (Khed Crime News) पैसे दिले तसेच व्याज व मुद्दलसह पैसे परत मिळाल्यानंतरही सावकराने कर्जदाराचा टेम्पो व दुचाकी जबरदस्तीने ताब्यात घेतली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १५ ऑक्टोबर २०२४ ते १६ मे २०२५ या कालावधीत खेड तालुक्यातील वाकी खुर्द या गावात घडली.
Nigdi : हरित सेतू प्रकल्पाबद्दल निगडी प्राधिकरणमध्ये बैठक
महेश कुंदन परदेशी (रा. वाकी खुर्द, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. श्रीकांत सखाराम वहिले (वय २९, रा. सुबरेनगर, वाकी खुर्द, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपीने त्याला परवाना नसताना ३ लाख ४० हजार रुपये फिर्यादी वहिले यांना व्याजाने दिले. त्यापोटी ५ लाख ६७ हजार रुपये व्याज व मुद्दलसह परत घेतले. तरीही आरोपीने फिर्यादीला धमकावत त्यांचा महेंद्रा टेम्पो व होंडा युनिकॉर्न दुचाकी ही वाहने जबरदस्तीने ताब्यात घेतली. पैसे दिले तरच वाहने परत मिळतील, अन्यथा विसरून जा, असे धमकावले. फौजदार बुरूड तपास करीत (Khed Crime News) आहेत.