Team MyPuneCity –कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी देत एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केले. हा धक्कादायक प्रकार १६ डिसेंबर २०२४ ते २६ एप्रिल २०२५ या कालावधीत खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथे घडला.असीम मुलानी (२६) याला पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपीने पीडित १६ वर्षीय मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर घडलेल्या प्रकाराबाबत कोणास काही सांगितले तर तिच्या कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी देत पुन्हा वारंवार अत्याचार केले. शनिवारी (२६ एप्रिल) पीडित मुलीला असीम याने पीडित मुलीला तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एका हॉटेलवर बोलावून घेतले. तिथेही त्याने तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार समोर येताच स्थानिक नागरिकांनी आरोपीला चांगला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.
Talegaon Dabhade: फायनान्स कंपनीत गुंतवणूक केल्यास २० टक्के परतावा देण्याचे आमिष; व्यक्तीची १८ लाखांची फसवणूक
पोलिसांनी असीम याला अटक केली. पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक आयुक्त राजेंद्रसिंग गौर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक संगीता कदम तपास करीत आहेत.