Team My Pune City –खेड तालुक्यात सर्वत्र शनिवारी ( दि. ६ ) गणेशोत्सवाचा जल्लोष सुरु (Khed)असताना ठिकठिकाणच्या विहिरी ,तलाव, नद्या याठिकाणी विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. अशातच खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक आणि बिरदवडी ,आणि शेलपिंपळगाव भागात चौघे बुडाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने खेड तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथे भामा नदीत गणपती विसर्जनादरम्यान दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला असून बिरदवडी येथे एकाचा विसर्जन करताना विहिरीत बडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. दरम्यान रात्री उशिरा प्राप्त झालेल्या माहितीनुसार शेलपिंपळगाव ( ता. खेड ) येथे देखील विसर्जन करताना एक जन बुडाला असून रेस्क्यू पथके रात्री साडेआठच्या सुमारास घटनास्थळी पोहचली असून शोध सुरु आहे.
महात्मा फुले चौक चाकण येथील शिवशाही करिअर अकॅडमी येथील नऊ ते दहा मुले अकॅडमी चा गणपती तसेच इतर घरगुती गणपती विसर्जन करण्याकरता शनिवारी ६ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास चाकण जवळील वाकी खुर्द हद्दीतील घोडदरी भागात प्रियदर्शनी शाळेच्या मागे भामा नदीच्या काठावर आले होते. गणपती विसर्जन करताना त्यातील एक तरुण बुडू लागला. त्याला वाचवण्यास गेलेल्या दोघांपैकी एकास बुडणाऱ्या तरुणाने मोठी मारली व दोघेही बुडाले. अभिषेक अशोक भाकरे ( वय 21 वर्ष रा. कोयाळी तर्फे चाकण, ता,खेड, जि. पुणे ) व अनंत जयस्वाल ( वय २०, रा. चाकण ) अशी बुडून मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत . एकाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले असले तरी दुसऱ्या मुलाचा मृतदेह सायंकाळी उशिरापर्यंत मिळाला नव्हता. चाकण रेस्क्यू टीम, एमडीएफ आणि अग्निशमन विभागाच्या वतीने दुसरा मृतदेह शोधण्याचे काम सुरु आहे.
Nana Peth Crime News : कोमकरचा खून प्रकरणी बंडू आंदेकरसह अकरा जणांवर गुन्हा
Jambhavede: गणेशोत्सवात महिलांसाठी खास आकर्षण – “खेळ रंगला पैठणीचा”!
बिरदवडी ( ता. खेड ) येथे विहिरीत गणेश विसर्जन करताना संदेश पोपट निकम ( वय 36 सध्या रा. बिरदवडी, मुळे वस्ती, मूळ रा .सिन्नर जि.नाशिक ) यांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. गणेश विसर्जनासाठी बिरदवडी येथील शेतातील विहिरीत संदेश निकम उतरले होते. मात्र अचानक पाण्यात खाली ओढल्याप्रमाणे झाल्याची विचित्र घटना घडून बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. विशेष म्हणजे संदेश निकम यांना चांगल्या प्रकारे पोहता येत असताना अचानक घडलेल्या या घटनेबाबत आश्चर्य आणि हळहळ व्यक्त होत आहे.
द रम्यान शेलपिंपळगाव मध्ये एक जण बुडल्याची माहिती समोर आली आहे. रात्री उशिरा रेक्यू टीम घटनास्थळी गेल्याचे सांगण्यात आले. गणेशोत्सवाच्या जल्लोषात या दुर्घटनेतील मृत्यू झालेल्या तरुणांच्या कुटुंबियांचा आक्रोश ऐकावयास मिळत होता. या दुर्घटनांमुळे तालुकाभारातून हळहळ व्यक्त होत आहे.


धरणातून विसर्ग; प्रचंड प्रवाह; धाडस बेतले जीवावर
भामा आसखेड धरणातून मोठ्याप्रमाणावर विसर्ग सूर असल्याने भामा नदीला सध्या खूप पाणी आहे. तसेच पाण्याचा प्रवाहही प्रचंड आहे. त्यामुळे गणेश विजर्सन करण्यासाठी कोणीही नदीपात्रात जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. ठिकठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आली होती. परंतु तरीही काही जणांकडून नदीपात्रात जात विसर्जन करण्याचे धाडस केले . हाच प्रकार वाकी जवळील भामा नदीत, बिरदवडी येथील विहिरीत आणि शेलपिंपळगाव येथे घडला. प्रवाहित पाण्यात उतरण्याचे धाडस चौघांच्या जिवावर बेतले आहे.