Kharadi News: खराडी बायपास चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तात्पुरते मार्गबदल लागू

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity – पुणे शहरातील वाहतूक सुरळीत (Kharadi News)आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशाने वाहतूक शाखेच्या वतीने खराडी बायपास चौकातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. हे बदल २४ एप्रिल २०२५ पासून पुढील आदेश येईपर्यंत लागू राहतील, अशी माहिती पोलीस उपआयुक्त (वाहतूक), अमोल झेंडे यांनी दिली आहे.

खराडी आणि चंदननगर वाहतूक विभागाच्या हद्दीत येणाऱ्या या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे नागरिकांचा प्रवास सुकर करण्यासाठी व अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या हेतूने खालीलप्रमाणे मार्गबदल करण्यात आले आहेत:

१. नगरकडून येणारी वाहने:
नगरकडून खराडी बायपास चौकाकडे येणारी वाहने सिग्नल विरहित (निरंतर) मार्गाने पुढे जाऊ शकणार आहेत. या लेनवर कुठल्याही अडथळ्याशिवाय वाहतूक चालू राहील.

२. पुण्याकडून मुंढवा-हडपसरकडे जाणारी वाहने:
अशा वाहनांनी चंदननगर येथील दोन्ही डिव्हायडर लेनमधून प्रवेश करून खराडी बायपास येथील सिग्नलद्वारे उजवीकडे वळून पुढे जावे. नगरकडे जाणाऱ्या वाहनांनी या डिव्हायडरमध्ये प्रवेश करु नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

३. मुंढवा-हडपसरकडून नगरकडे जाणारी वाहने:
ही वाहने खराडी बायपास चौकात सिग्नलद्वारे उजवीकडे वळून डिव्हायडर लेनमधून पुढे जावीत आणि खराडी दर्गा जंक्शनवरून डावीकडे वळून नगर रोड लेनमध्ये प्रवेश करावा.

पोलीस विभागाने नागरिकांना या बदलांची माहिती करून घेण्याचे व त्याचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. हे बदल तात्पुरते असले तरी वाहतूक व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

https://youtu.be/AwU80BMOQnY?si=uOced68scXG6Smoi

Follow Us On