Team MyPuneCity – शहरातील खराडी-मुंढवा बायपास रस्त्यावरील ‘प्राईड आयकॉन’ या इमारतीत सुरु असलेल्या एका बनावट कॉल सेंटरवर पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली. शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या या कारवाईत दीडशे ते दोनशे पोलिस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. या छाप्यातून अमेरिकन (Kharadi Crime News) नागरिकांना डिजिटल अटकेच्या बहाण्याने फसवणाऱ्या सायबर फसवणूक रॅकेटचा भांडाफोड झाला आहे.
या कारवाईत मॅग्नेटल बीपीएस अॅण्ड कन्सल्टन्सी एलएलपी या नावाने सुरू असलेल्या कॉल सेंटरमधून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून, शंभर ते दीडशे कर्मचारी या ठिकाणी कार्यरत असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. हे सर्व कर्मचारी आणि मुख्य सूत्रधार गुजरातमधील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी ६१ लॅपटॉप, ४१ मोबाईल आणि अन्य महत्त्वाचे दस्तऐवज जप्त केले आहेत.
Crime News: उर्से गावात वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून महिलेवर दिर व जाऊंकडून काठीने हल्ला
प्राथमिक तपासात, या कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना “डिजिटल अटक” होणार असल्याचे सांगून त्यांच्याकडून पैसे उकळले जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित कॉल्सद्वारे भीती दाखवून लोकांना वेगवेगळ्या अकाऊंट्समध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास भाग (Kharadi Crime News) पाडले जात होते.
पोलिसांनी या छाप्याची अधिकृत नोंद करत तपास सुरु केला आहे. यामध्ये आणखी काही आरोपी आणि आर्थिक व्यवहार उघडकीस येण्याची शक्यता आहे. पुणे सायबर पोलिसांनी हे संपूर्ण रॅकेट उध्वस्त करत एक मोठी फसवणूक रोखली आहे.
दरम्यान, मुंबईच्या कुर्ला भागातूनही एक सायबर गुन्हा उघडकीस आला आहे. एका खासगी कंपनीचा डेटा हॅक करून ४.२५ लाख रुपयांच्या बिटकॉइनमध्ये खंडणी मागण्यात आली होती. हॅकर्सनी “खंडणी दिल्यासच डेटा परत मिळेल” असा इशारा दिला होता. या प्रकरणीही सायबर पोलिसांकडून (Kharadi Crime News) तपास सुरू आहे.