situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Khandala: पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात; २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Published On:

मावळ ऑनलाईन – पुणे-मुंबई महामार्गावर खंडाळा परिसरात एका भरधाव पिकअपने दुचाकीस्वाराला समोरून धडक दिल्याने २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना बुधवारी दुपारी घडली. या प्रकरणी पिकअप चालकाविरुद्ध लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत युवक सौरभ सुखदेव वाघ (वय २४, रा. खंडाळा, ता. मावळ, जि. पुणे) हा टीव्हीएस कंपनीत नोकरीस असून, ५ जून २०२५ रोजी दुपारी ४.३५ च्या सुमारास कामावरून सुटल्यावर त्याच्या टीव्हीएस आर.आर. ३१० या दुचाकीने (क्र. एम.एच.४१ बी.जे. ९२७६) खंडाळ्याच्या दिशेने जात होता.

पी.टी.सी.जवळील एच.पी. पेट्रोलपंपासमोर पुणे-मुंबई महामार्गावर समोरून येणाऱ्या महिंद्रा पिकअप गाडीने (क्र. एम.एच.१२ एक्स. एम.२६१४) त्याच्या दुचाकीला जबर धडक दिली. ही गाडी अभय बाळासाहेब डाफळ (रा. धामारी, ता. शिरुर, जि. पुणे) याच्या ताब्यात होती. अपघातात सौरभच्या डोक्याला गंभीर इजा झाली व तो जागीच ठार झाला.

याप्रकरणी सौरभच्या मेव्हण्याने अनिल विजय जाधव (वय ३०, व्यवसाय: चालक, रा. खंडाळा, ता. मावळ, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिकअप चालक अभय डाफळ याने वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून, हयगयीने व बेदरकारपणे वाहन चालवले. त्यामुळे झालेल्या या अपघातात सौरभचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

लोणावळा शहर पोलिसांनी अभय डाफळ याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या १०६(१), १२५(इ), ३२४(४)(५), २८१ व मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Follow Us On