situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Khandala Car Fire : खंडाळा घाटात आडोशी बोगद्याजवळ धावत्या कारला अचानक आग; चालकाचा प्रसंगावधानाने जीव वाचला

Published On:
Khandala Car Fire
---Advertisement---

Team MyPuneCity – पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण एक्स्प्रेस वेवर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ काल (शुक्रवारी) मध्यरात्री एका धावत्या प्रवासी कारने अचानक पेट (Khandala Car Fire) घेतल्याची घटना घडली. या आगीमुळे कार पूर्णतः जळून खाक झाली. सुदैवाने, प्रसंगावधान राखत चालकाने वेळेत कार थांबवून बाहेर उडी मारल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

सविस्तर माहितीनुसार, ही घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. मुंबईहून पुण्याकडे निघालेली ही कार आडोशी बोगद्याच्या जवळ असताना अचानक तिच्या इंजिनातून धूर येऊ लागला. ही स्थिती लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत कार तत्काळ रस्त्याच्या कडेला घेतली आणि गाडीच्या बाहेर उडी मारली. काही क्षणातच संपूर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी (Khandala Car Fire) पडली.

Kondiwade Murder : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीची हत्या; पतीला अटक

आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे आसपासचे वाहनचालक सैरभैर झाले. काही जागरूक वाहनचालकांनी तातडीने महामार्ग पोलीस आणि अपात्कालीन सेवा यांना संपर्क साधला. काही वेळातच अपघातग्रस्त ठिकाणी बोरघाट महामार्ग पोलिसांची टीम, अपात्कालीन वाहतूक नियंत्रण यंत्रणा आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी अथक प्रयत्न करण्यात आले.

या घटनेमुळे एक्स्प्रेस वेवरील मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. बोगद्याजवळ वाहने मोठ्या प्रमाणावर रांगेत थांबली होती. मात्र, पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करत वाहतूक नियंत्रित केली व आग आटोक्यात आल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट; लग्नावेळी हुंड्यात घेतलेलं 51 तोळे सोनं राजेंद्र हगवणेंनी बँकेत गहाण ठेवले

या घटनेत कोणीही जखमी झाले नसले तरी कार पूर्णपणे जळून खाक झाली (Khandala Car Fire) असून वाहनाचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकारामुळे एक्स्प्रेस वेवरील वाहनचालकांनी वाहनांची वेळोवेळी तपासणी करूनच प्रवास करावा, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात येत आहे.

Follow Us On