Team My pune city –तरुणाला कामावर जाण्यासाठी उशीर झाल्याने त्याने एका दुचाकीस्वाराकडे लिफ्ट मागितली. मात्र दुचाकीवरील हा प्रवास तरुणाचा अखेरचा ठरला. एका कंटेनरच्या धडकेत तरुण कंटेनरखाली चिरडला गेला. त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात सोमवारी (१४ जुलै) सकाळी पावणे सात वाजता खेड तालुक्यातील खालूंब्रे येथे घडला.
गजानन बाबुराव बोलकेकर (२६, नांदेड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. आदित्य गजाननराव गायकवाड (२३, येलवाडी, खेड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विजय शंकरराव तंतरपाले (२४, चाकण) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोहम्मद अरमान कमरुद्दीन खान (३०, धारावी, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे.
MLA Mahesh Landge : उद्योग क्षेत्रातून टॅक्स घेता, मग सुविधा का देत नाही?
Lohagad Fort : लोहगड किल्ल्याच्या जागतिक वारसा नोंदीसाठी संपर्क संस्थेचा खारीचा वाटा -अमित कुमार बॅनर्जी
गजानन हा चाकण एमआयडीसी मधील एका कंपनीत नोकरी करत होता. सोमवारी तो पहिल्या शिफ्टसाठी कामावर जाण्यासाठी घरातून निघाला. कामावर पोहोचण्यासाठी त्याला उशीर होत असल्याने त्याने रस्त्यात एका दुचाकीस्वाराकडे लिफ्ट मागितली. दुचाकी चालक आदित्य गायकवाड याच्या सोबत जात असताना खालूंब्रे येथील हुंडाई चौकाजवळ आल्यानंतर कंटेनरची दुचाकीला धडक बसली. या अपघातात गजानन हा कंटेनर खाली चिरडला गेला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.