Team My Pune City – खडकवासला धरणाच्या(Khadakwasla Water Update) सांडव्यावरून मुठा नदी पात्रात सुरू असलेला ७,६७७ क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढवून आज (सोमवार) सकाळी ९ वाजता १०,६११ क्युसेक करण्यात आला आहे.
पावसाच्या प्रमाणानुसार आणि धरणातील पाणीसाठ्याच्या(Khadakwasla Water Update) स्थितीनुसार हा विसर्ग आवश्यकतेनुसार पुढील काही तासांत कमी किंवा जास्त केला जाऊ शकतो, अशी माहिती मुठा कालवे पाटबंधारे उपविभाग, स्वारगेट, पुणे येथील उपविभागीय अभियंता मोहन भदाणे यांनी दिली.
Rashi Bhavishya 15 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून धरण परिसरात (Khadakwasla Water Update) आणि वरच्या पाणलोट भागात पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा नियोजनबद्ध पद्धतीने नियंत्रित ठेवण्यासाठी विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, मुठा नदी पात्राजवळ अनावश्यक वावर टाळावा, तसेच नदीकाठच्या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे. पावसाच्या प्रमाणानुसार आणि येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहानुसार विसर्गात पुन्हा बदल होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून सतत परिस्थितीवर लक्ष ठेवले जात ( Khadakwasla Water Update) आहे.