Team My Pune City – खडकवासला धरणामध्ये आज (दि. 28 जुलै) सायंकाळी एका तृतीयपंथीय बुडाल्याची घटना घडली. सायंकाळी सुमारे सव्वा पाच च्या वाजण्याच्या सुमारास ही वर्दी मिळताच नवले अग्निशमन केंद्रातील जवान आणि PMRDA अग्निशमन विभाग तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
स्थानिक नागरिकांनी धरणाच्या पाण्यात उडी मारलेल्या इसमाचे नेमके ठिकाण दाखवून दिल्यानंतर, जवानांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. या शोध मोहिमेसाठी ‘गायलाइन’ (सुरक्षारज्जू) आणि लोखंडी गळ्याचा वापर करण्यात आला. दलातील जवानांनी एकूण तीन गळ्यांच्या सहाय्याने पाण्यात खोलवर शोध घेतला. अखेर काही वेळाच्या अथक प्रयत्नांनंतर संबंधित इसमास पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले.
या व्यक्तीची ओळख निलेश ऊर्फ सोनाली सुरेश खंडागळे (वय 23, लिंग: तृतीयपंथी) अशी झाली आहे. पाण्यातून बाहेर काढल्यानंतर संबंधित इसमाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास तत्काळ ॲम्बुलन्सद्वारे रुग्णालयात हलवण्यात आले.
Talegaon Dabhade: कै. डॉ. जयंत नारळीकर स्मृती विज्ञान लेखन पुरस्कार सोहळा संपन्न
Chakan: चाकण औद्योगिक क्षेत्राच्या समस्यामुक्तीसाठी महायुती सरकार ‘ऑन ॲक्शन मोड’
या बचाव मोहिमेत नवले अग्निशमन केंद्राचे चालक नरेश पांगारे, फायरमन भरत गोगावले, आदित्य मोरे आणि ऋषिकेश हुंबे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना PMRDA अग्निशमन विभागाच्या जवानांनी ही कामगिरी बजावली
पावसाचा जोर वाढल्याची धरणसाठ्यातील येवा वाढला आहे.त्यामुळे पर्यटकांनी पाण्यात उतरू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.