Team My Pune City – खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रामध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग आज सकाळी 11 वाजता 1400 क्युसेक्स वरून वाढवून 2464 क्यूसेक्स करण्यात आला आहे. पावसाच्या वाढत्या प्रमाणामुळे धरणातील ( Khadakwasla Dam) पाणीसाठ्यात वाढ झाल्याने हा निर्णय घेण्यात आला असून, पुढील काळात हवामान व पावसाच्या स्थितीनुसार हा विसर्ग आणखी कमी अथवा जास्त होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.
Pune Crime News : प्रवाशांना लुटणारी टोळी गजाआड, साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, सध्या खडकवासला धरण सांडव्यावरून विसर्ग सुरू असून, नागरिकांनी नदीपात्राच्या जवळ जाणे टाळावे, सुरक्षित अंतर ठेवावे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Krishnarao Bhegde : कृष्णराव भेगडे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडून भावपूर्ण श्रद्धांजली
धरण क्षेत्र ( Khadakwasla Dam) व परिसरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पावसाचे प्रमाण वाढत असल्याने धरणात जलसाठा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे संभाव्य पूरस्थितीची पूर्वतयारी म्हणून विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेतल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.