Team My Pune City – पुणे जिल्ह्यात सलग ( Khadakwasla Dam) पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. यामुळे खडकवासला पाटबंधारे विभागाने धरणांचा विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, खडकवासला धरणातून आज (बुधवारी) सकाळी 8 वाजता 34 हजार 302 क्युसेक विसर्ग सुरू असून तो वाढवून 48 हजार क्युसेकपर्यंत नेण्यात येणार आहे. त्याचबरोबर पानशेत धरणातून व वरसगाव धरणातून 12 हजार क्युसेक व टेमघर धरणातून 2 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.
Kundamala News : कुंडमळा येथील तुटलेल्या पुलाचा सांगाडा नदीत गेला वाहून
या विसर्गामुळे मुठा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाणीपातळी वाढणार ( Khadakwasla Dam)असून, नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेषतः नारायण पेठेतील येरवडा पूल, संगमवाडी परिसरातील होलकर पूल, शनिवर पेठेतील गणेश मंदिर व परिसर, सिंहगड रोडवरील नवी पुलवाडी, दत्तवाडी परिसर, तसेच बालेवाडी, राजेंद्र नगर, विद्यानगर व अर्जुन बार्डेजवळील साळी पूल परिसर धोक्याच्या स्थितीत येऊ शकतो.
मुठा नदीसाठी इशारा( Khadakwasla Dam) पातळी 60 हजार क्युसेक नि विसर्ग धोक्याची पातळी 1 लाख क्युसेक नि विसर्ग इतकी निश्चित करण्यात आली आहे. सध्या पाणीपातळी वाढती आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात किंवा पूल परिसरात अनावश्यक वर्दळ न करता सुरक्षित ठिकाणी राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Alandi : इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ; नदीपात्रातील पाणी शनी मंदिरापर्यंत
दरम्यान, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका, जिल्हा प्रशासन, तसेच पोलिस यंत्रणा यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात ( Khadakwasla Dam) आल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागानेही दक्षता घ्यावी, असे आदेश जारी करण्यात आले आहेत.