Team My pune city –चाकण आळंदी रस्त्यालगत आळंदी घाट( Kelgaon Forest Reserve) मौजे केळगावच्या राखीव वनक्षेत्रात दि. ३१ रोजी आरोपी आयुब पापामिया हवलदार ( वय ५४ वर्ष, रा. शुक्रवार पेठ, ता. जुन्नर , जि. पुणे ) यांनी कचरा टाकल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहितीनुसार, मौजे केळगाव येथील राखीव वनक्षेत्र कक्ष क्र ३६१ मध्ये आरोपी आयुब पापामिया हवलदार याने ट्रक च्या साहयाने टाकाऊ कचरा टाकल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक म्हणाले, आरोपी आयुब पापामिया हवलदार यांनी त्यांच्या मालकीच्या ट्रकने मौजे धानोरे येथुन प्लास्ट्रर ऑफ पॅरिस खराब असलेले साहित्य ( Kelgaon Forest Reserve)आळंदी चाकण रस्ता (आळंदी घाट) येथील राखीव वनक्षेत्रात टाकला. सदर कचरा टाकल्यामुळे राखीव वनातील पाणी दुषित होऊन वन्यप्राणी, पक्षी यांचे जीवितास धोका होऊ शकतो. त्यामुळे शासकीय राखीव वनक्षेत्रात अवैध प्रवेश करुन कचरा टाकणे भारतीय वन अधिनियम १९२७ अन्वये प्रतिबंधित असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यास २ वर्षापर्यंत कारावास तसेच रू. ५०००/- पर्यंतच्या द्रव्यदंडाची तरतुद आहे.
Kanbai Mata Utsav : पिंपरी चिंचवड मध्ये आई कानबाई माता उत्सवाला उद्यापासून सुरूवात
सदर कारवाई जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत शिंदे, सहाय्यक वनसंरक्षक, वनविभाग जुन्नर, संतोष कंक, वनपरिक्षेत्र अधिकारी चाकण, आनंदकुमार इंदलकर, वनपाल आळंदी, वनरक्षक अचल गवळी, नवनाथ पगडे यांनी पार पाडली असून पुढील तपास इंदलकर हे करत आहेत.
” जुन्नर वनविभाग मधील वनपरिक्षेत्र चाकण अंतर्गत येणारे केळगाव व आळंदी परिसर हा माऊली चे पावनभूमी क्षेत्राचा भाग असुन या ठिकाणी देशातील वेगवेगळ्या भागातून ( Kelgaon Forest Reserve) मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात.
Vadgaon Maval News : वडगावातील अवैध धंदे बंद करण्याची शहर भाजपाची मागणी
वनक्षेत्रात कचराटाकल्यामुळे वन्यप्राण्यांच्या जीवास धोका होऊ शकतो. त्यामुळे सदर भागात ट्रॅप कॅमेरे लावून प्रतिबंधक भरारी पथकामार्फत नजर ठेवली जात आहे. सर्वांना आवाहन करणेत येत आहे की, कोणीही शासकीय राखीव वनात अवैध प्रवेश करु नये, कोणीही वनात कचरा टाकू नये, अन्यथा संबंधितांवर भारतीय वन अधिनियम १९२७, तसेच वन्मजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अंतर्गत कडक कारवाई करण्यात येईल. वन्यजीवप्रेमी , निसर्गप्रेमी तसेच जागरूक नागरीकांनी कचरा टाकणाऱ्या व्यक्तीची नावे वनविभागस कळविल्यास त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन त्यांचा ( Kelgaon Forest Reserve) सन्मान करणेत येईल. “