Team My Pune City – कात्रजमधील सोनवणे बिल्डिंगमध्ये सोमवारी सकाळी एक हृदयाचा ठोका चुकवणारी घटना घडली. अवघ्या चार वर्षांची एक मुलगी तिसऱ्या मजल्यावरील खिडकीच्या ग्रिलमधून बाहेर पडत असताना, प्रसंगावधान राखून धावलेल्या अग्निशमन दलाच्या जवानामुळे तिचा जीव थोडक्यात वाचला. ही धाडसी कारवाई अग्निशमन दल, तांडेल चे योगेश अर्जुन चव्हाण यांनी पार पाडली.
ही घटना पुण्यातील कात्रज परिसरातील गुजर निंबाळकरवाडी, खोपडे नगरमधील सोनवणे बिल्डिंगमध्ये ही घटना घडली. सकाळी 9 वाजून 6 मिनिटांनी, स्थानिक रहिवासी उमेश सुतार यांनी इमारती बाहेरून एका मुलीचा जीव धोक्यात असल्याचा प्रकार पाहिला आणि तात्काळ आरडा-ओरडा केला.
Policeman’s Suicide : स्वारगेट पोलीस वसाहतीत पोलिसाची गळफास घेत आत्महत्या
अग्निशमन दलाचे जवान योगेश चव्हाण, जे तेथून अगदी जवळ होते, त्यांनी आवाज ऐकताच तत्काळ गॅलरीत येऊन पाहणी केली. खिडकीच्या बाहेर अडकलेली चार वर्षांची भाविका चांदणे नावाची मुलगी दिसताच त्यांनी एक क्षणही न घालवता इमारतीकडे धाव घेतली.

ती मुलगी ज्या घरात होती, ते कुलूपबंद होतं. तिची आई दुसऱ्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी बाहेर गेली होती. चव्हाण यांनी धीर न सोडता तिसऱ्या मजल्यावर पोहोचून आईची वाट पाहिली. आई आल्यावर दरवाजा उघडताच त्यांनी तात्काळ भाविकाला खिडकीतून ओढून सुरक्षितपणे आत घेतलं.
Pavana Dam : पवना व आंद्रा धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ,पवना 77 टक्के तर आंद्रा 92 टक्के
“घटनेची माहिती मिळताच मी सोनवणे बिल्डिंगकडे धाव घेतली. तिसऱ्या मजल्यावर पोहोचून मुलीला सुरक्षित बाहेर काढलं,” असं योगेश चव्हाण यांनी सांगितलं.
या धाडसी कृतीमुळे एक निष्पाप जीव वाचला असून, परिसरातील नागरिक आणि स्थानिकांनी त्यांच्या या कर्तव्यदक्षतेबद्दल भरभरून कौतुक केलं आहे. मात्र घरात लहान बाळ असताना पालकांनी हलगर्जीपणा न करता योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन अग्निशमन दलाच्यावतीने केले गेले आहे.