Team My Pune City – गॅलरीचा दरवाजा उघडून घरात प्रवेश करत चोराने घरातील तब्बल साडेतीन लाख रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे. ही घटना कर्वेनगर येथे 29 जून (रविवारी) रोजी घडली आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात 41 वर्षीय नागरिकाने तक्रार दिली आहे. यावरून पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधक गुन्हा दाखल केला आहे.
Pune Crime News : बुरखाधारी महिलांकडून सराफी पेढीतून 5.22 लाखांच्या दागिन्यांची चोरी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या राहते घरात फिर्यादी व त्यांचे कुटुंबीय हे झोपले होते. यावेळी चोरांनी आदी नसलेला घरातील बेडरूमचा गॅलरीचा दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. त्यांनी कपाटातील तीन लाख साठ हजार रुपयांची रोख रक्कम चोरी करून नेली. याचा पुढील तपास वारजे माळवाडी पोलीस करत आहेत.