Team My Pune City –स्वच्छता कर्मचारी हे समाजातील खरे(Kartavya Ratna Award) हिरो आहेत. तुम्हाला सन्मानित करताना आम्हाला अभिमान वाटावा असा हा क्षण आहे. या निमित्ताने अर्थपूर्ण कार्य घडत आहे, असे गौरवोद्गार सुप्रसिद्ध अभिनेते पुष्कर जोग यांनी काढले.निमित्त होते कर्तव्यरत्न पुरस्कार सोहोळ्याचे. या कार्यक्रमात निस्वार्थ सेवा करणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांचा हृद्य सत्कार करून त्यांच्या अथक परिश्रमाला व समाजासाठीच्या योगदानाला मानाचा मुजरा करण्यात आला.
एनइसीसी व व्हेनकॉब या संस्थांच्यावतीने व पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने औंध येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कलामंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची संकल्पना राकेश मल्होत्रा व श्रुती बेंग्रे यांची होती.(Kartavya Ratna Award)
स्वच्छता अधिकारी व कर्मचाऱ्यांनी छोटी छोटी पावले घेत नेटाने केलेले डोंगराएवढे काम अतिशय मोलाचे असून नागरिकांनीही समाजभान जपत आपल्या परिसरातील स्वच्छता सांभाळणे, कचऱ्याचे वर्गीकरण योग्य पद्धतीने करणे, ओला कचरा जास्तीत जास्त प्रमाणात घरगुती स्वरूपात जिरविल्यास स्वच्छता सेवकांचे आयुष्य सुकर होईल, असे मौलिक विचार सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मीता गोंदकर यांनी व्यक्त केले.
समर्पण, चिकाटी आणि निस्वार्थ सेवेची दखल घेत कर्तव्यरत्न पुरस्काराने महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या प्रसंगी सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा चोप्रा, रेशम टिपणीस, मुग्धा गोडसे, स्मिता गोंदकर यांच्यासह सुप्रसिद्ध अभिनेते पुष्कर जोग व शीव चोरडिया तसेच बी. के. सिंग आणि नौशाद शेख यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
Prashant Bhagwat : विकास, समाजकार्य आणि जनसंपर्क यांचा अद्भुत संगम म्हणजे प्रशांत दादा भागवत
हे आहेत कर्तव्यरत्न पुरस्काराचे मानकरी..(Kartavya Ratna Award)
ज्ञानेश्वर मोळक (माजी अतिरिक्त आयुक्त, पुणे मनपा), महादेव जाधव (माजी सफाई सेवक व पुणे मनपा ब्रँड अॅम्बॅस्डर), इम्मामुद्दिन इनामदार (मुख्य आरोग्य निरीक्षक), आशिष कोळगे (उपअभियंता – यांत्रिकी), शकमलेश शेवते (उपअभियंता), महेंद्र सावंत (वरिष्ठ आरोग्य निरीक्षक), राहुल राजगोळकर (वरिष्ठ आरोग्य निरीक्षक), नवनाथ शेलार (आरोग्य निरीक्षक), सुषमा मुंडे (आरोग्य निरीक्षक), प्रदीपकुमार राऊत (आरोग्य निरीक्षक), प्रीती भांडगे (आरोग्य निरीक्षक), किरण मांडेकर (आरोग्य निरीक्षक), राहत कोकणी (स्वच्छता निरीक्षक), चेतन राजेंद्र धडे (सफाई सेवक), संतोष उमापे (सफाई सेवक), नागेश चावतमहाल (सफाई सेवक), कमलाकर सुर्यवंशी (सफाई सेवक), अनिल भगवणे (सफाई सेवक), गोपाळ अडसूळ (मुकादम), विलास रामचंद्र थोरात (सफाई सेवक), कैलास विश्वनाथ डोलारे (सफाई सेवक), राजश्री फासगे (सफाई सेवक), भीमराव क्रांती (जेसीबी ऑपरेटर), वैजनाथ गायकवाड (मुकादम), नरेंद्र दीक्षित (मुकादम), दत्तात्रय जगताप (सफाई सेवक), बायदा गायकवाड (स्वच्छ सेवा संस्था), समीन मुलानी (स्वच्छ सेवा संस्था), अवंता शेंडगे (स्वच्छ सेवा संस्था), किरण थोरात (स्वच्छ सेवा संस्था) यांच्या या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.