Team MyPuneCity – पिंपरी चिंचवड शहरात खान्देशवासीयांच्या ( Kanbai Mata Utsav)धार्मिक आणि सांस्कृतिक श्रद्धेचे प्रतीक असलेल्या आई कानबाई मातेच्या सार्वजनिक उत्सवाचे आयोजन यंदा २ ते ४ ऑगस्ट २०२५ या कालावधीत करण्यात आले आहे. खान्देश समाजाच्या परंपरा, संस्कृती आणि धार्मिक सण पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरावेत आणि त्यांचा वारसा अखंडित राहावा, या उद्देशाने हा उत्सव साजरा केला जात आहे.
Dr. Deepak Harke : ब्रिटिश पार्लमेंट, लंडन मध्ये डॉ. दीपक हरके यांचा एक्सलेंस अवॅार्ड देऊन सन्मान
उत्सवाची सुरुवात २ ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता गणपती मंदिर, शिवनगरी, बिजलीनगर येथे गहू दळणे आणि सप्तपुजनाने होणार असून, ३ ऑगस्ट रोजी दुपारी दोन ते सहा या वेळेत मंदिर ते पीएमआरडीए मैदान, वाल्हेकरवाडी पोलीस चौकीसमोरील परिसरात भव्य मिरवणूक निघणार आहे. मिरवणुकीमध्ये स्वरगंगा बँड (नंदाणे, धुळे) सहभागी होणार असून, सायंकाळी सहा वाजता देवीची प्रतिष्ठापना होईल. त्यानंतर मान्यवरांचा सन्मान, दर्शन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष आकर्षण म्हणून आबा चौधरी आणि धीरज चौधरी (खानदेश किंग ग्रुप, शिरपूर) यांच्या देवी जागर आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण होणार ( Kanbai Mata Utsav)आहे.
Fraud : लग्नाच्या आमिषाने महिलेची ११.८१ लाखांची फसवणूक
४ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता विसर्जन मिरवणुकीने उत्सवाची सांगता होणार असून, मिरवणूक पीएमआरडीए मैदान ते जाधव घाट, रावेत या मार्गावरून पार पडेल. यासाठी शहरातील विविध खान्देशी समाजबांधवांचे समन्वयाने आयोजन करण्यात आले असून, महिलांनी पारंपरिक नऊवारी साडी आणि पुरुषांनी पारंपरिक पोशाख परिधान करावा, तसेच काळ्या रंगाचे कपडे टाळावेत ( Kanbai Mata Utsav) असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
उत्सवात हभप रविकिरण महाराज दोंडाईचेकर, नामदेव जाधव, सचिन सोनवणे यांच्यासह खान्देशातील विविध कलाकार सहभागी होणार आहेत. आई कानबाई माता उत्सव समिती आणि कानबाई माता चॅरिटेबल ट्रस्ट पिंपरी चिंचवड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमासाठी मराठा, माळी, राजपूत, लेवा, धनगर, नाभिक, वाणी, ब्राह्मण, बंजारा, मुस्लिम आदी विविध समाजबांधवांचे योगदान लाभले आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील सर्व श्रद्धावानांनी सहकुटुंब ( Kanbai Mata Utsav) सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.