situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Kamshet: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त कामशेत येथे शिवस्मारकाचे भूमिपूजन

Published On:

Team MyPuneCity –महाराष्ट्राच्या इतिहासातील तेजस्वी पर्व अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त, कामशेत शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचा सोहळा आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.

“स्वराज्याचा मंत्र घराघरात पोहोचवणारे छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यांच्या स्मरणातून समाजाला प्रेरणा मिळावी, म्हणून कामशेतमध्ये शिवस्मारक उभारणे ही काळाची गरज आहे. हे स्मारक भविष्यातील पिढ्यांना इतिहासाची आठवण करून देणारे तेजोमय स्थान ठरेल,” असे प्रतिपादन आमदार सुनील शेळके यांनी यावेळी केले.

Chinchwad: “पर्यावरण दिनी ‘एक झाड एक आशा’ उपक्रम: आमदार अमित गोरखे यांचा विद्यार्थ्यांसह हिरवा संकल्प”

शिवस्मारकाच्या प्रस्तावित जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन व दुग्धाभिषेक करण्यात आला. संपूर्ण परिसर “जय भवानी, जय शिवाजी!” च्या जयघोषांनी दुमदुमून गेला. उपस्थित नागरिकांनी महाराजांना अभिवादन करत स्वराज्याची प्रेरणा घेण्याचा संकल्प केला.

राज्याभिषेक दिन म्हणजे केवळ एक ऐतिहासिक आठवण नव्हे, तर स्वाभिमान, स्वयंपूर्णतेचा आणि समाजहितासाठी समर्पणाचा संदेश देणारा साजरा करण्याचा दिवस. या पार्श्वभूमीवर आजचा सोहळा भक्तिपूर्ण, तेजस्वी आणि प्रेरणादायी असा झाला.

या कार्यक्रमाला शिवप्रेमी, स्थानिक ग्रामस्थ, महिला, युवक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवस्मारक समिती, कामशेत यांच्या सक्रिय सहभागामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. भविष्यात स्मारकाचे काम निर्विघ्नपणे पूर्ण व्हावे यासाठी समितीने महत्त्वाचे योगदान दिले आहे.

उपस्थित मान्यवरांमध्ये माऊली शिंदे, तानाजी दाभाडे, राजाराम शिंदे, रुपेश गायकवाड, गजानन शिंदे, रमेश लुनावत, निलेश दाभाडे, दत्तात्रय शिंदे, विकेश मुथा, विलास भटेवरा, पारस परमार, मीनाक्षी वाळुंज, विमल पडावकर, कोंडीबा रोकडे, अनिता गायखे, परेश बरदाडे तसेच शिवस्मारक समिती, कामशेतचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आठवण करून देणारा आणि स्वराज्याच्या मूल्यांची जपणूक करणारा हा सोहळा भाविकांच्या मनात दीर्घकाळ लक्षात राहील, यात शंका नाही.

Follow Us On