Team My pune city –आळंदी येथील श्री काळभैरवनाथ पुरातन मंदिरातील श्रींच्या मूर्तीस वज्रलेप देऊन तिची प्राणप्रतिष्ठा करून स्थापित करण्यात ( Kalbhairav Pranpratishtha) आली.आज दि .३१ रोजी श्री काळ भैरवनाथ महाराज प्राणप्रतिष्ठा महोत्सवा निमित्त मंदिरात आकर्षक फुलसजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
तत्पूर्वी शांतीयुक्त पठन महाभिषेक उत्तरांग हवन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा,बलिदान ,कलशारोहन,महानैवेद्य महाआरती , पूर्णाप्रतिष्ठा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अनेक भाविकांनी श्री कालभैरवनाथाचे दर्शन घेतले.
Nigdi robbery case : मोबाईल ट्रेस होऊ नये म्हणून दरोडेखोरांकडून वॉकी टॉकीचा वापर
या महोत्सवानिमित्त दि.२८ रोजी श्रींच्या मूर्तीची फटाक्यांच्या अतिषबाजीत,ढोल ताश्यांच्या गजरात,आकर्षक विद्युत रोषणाई व आकर्षक सजावट केलेल्या रथात भव्य स्वरूपात मिरवणूक काढण्यात आली. दि.२९ रोजी प्रायश्चित्त संकल्प गणपती पुण्याहवाचन ,पंचाग कर्म मंडप प्रवेश, सर्व मंडलांची स्थापना ,अरणी मंथन ,नवग्रह हवन, जलधिवास कुटीर हवन ,महाआरती असे विधि संपन्न झाले.
Poultryshed : पोल्ट्रीशेड नोंदणी अभियान मावळात वेगाने सुरू
दि.३० रोजी शांतीयुक्त पठन प्रधानसंकल्प अभिषेक पूजन प्रधान, हवन स्नपन विधि धान्यअधिवास, शय्यधिवास ,दिपउत्सव ,नैवद्य ,महाआरती इ.विधि संपन्न झाले. या महोत्सवाचे समस्त आळंदीकर ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजन करण्यात आले ( Kalbhairav Pranpratishtha) होते.