Team My Pune City – माध्यमांशी संवाद साधताना आमदार शंकर मांडेकर यांनी स्पष्ट केले की, “माझ्या भावाकडे बंदुकीचे( Kalakendra Firing) लायसन्स नाही, तसेच त्याच्याकडे बंदूकही नाही. तो समाजसेवक असून, शेती आणि वारकरी संप्रदायाचे कार्य करतो.” मात्र, बाळासाहेब मांडेकरसोबत असलेल्या व्यक्तींपैकी ‘जगताप’ नावाच्या व्यक्तीकडे बंदूक असल्याचे त्यांनीच पुढे सांगितले.
Dhanore Murder : डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारून खून, आळंदी पोलिसांनी घेतले दोन आरोपींना ताब्यात
दौंड तालुक्यातील वखारी येथे सोमवारी (दि.21) रात्री न्यू अंबिका कला केंद्रात झालेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांचा लहान भाऊ बाळासाहेब मांडेकर याचा सहभाग असल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळातही एकच खळबळ उडाली आहे.
गोळीबाराच्या प्रकरणी पोलिसांनी बाळासाहेब मांडेकर याच्यासह गणपत जाधव आणि चंद्रकांत मारणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यातील गणपत जाधव( Kalakendra Firing) याच्याकडे बंदूक असून, गोळीबार त्याच्याच बंदुकीतून झाला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, नेमकी गोळी कोणी चालवली, हे पोलीस तपासात स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, गोळीबारामुळे कला केंद्रात उपस्थित असलेल्या एका महिलेला गोळी लागल्याची चर्चा सुरू होती. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना याचे खंडन केले. “गोळीबार हा हवेत करण्यात आला होता. महिलेला गोळी लागलेली नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी त्यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षकांशी थेट संपर्क साधल्याचेही( Kalakendra Firing) सांगितले.
घटनेबाबत बोलताना आमदार मांडेकर म्हणाले, “चार भावांपैकी एक चोर असतो, तर एक देव असतो. चुक कोणाचीही असो, शासन त्याला शिक्षा देईल. या प्रकरणात मी कोणत्याही प्रकारचा दबाव टाकलेला नाही,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान, या प्रकरणाने राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, नेमका गोळीबार कोणी आणि कशासाठी केला याचा तपास लवकरात लवकर पूर्ण व्हावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून ( Kalakendra Firing) होत आहे.