Team My pune city – रावेत येथील जिजाऊ क्लिनिक (Jijau Clinic)आणि नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र या आरोग्य सेवांच्या केंद्रांमध्ये पूर्णवेळ डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे स्थानिक नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. या समस्येकडे लक्ष वेधत युवा सेना जिल्हाप्रमुख राजेंद्र बाळासाहेब तरस यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे लेखी निवेदनाद्वारे तातडीची मागणी केली आहे.
Shekhar Singh : तंत्रज्ञानातील नवनवीन कौशल्य युवकांनी आत्मसात करण्याची गरज – आयुक्त शेखर सिंह
शासनाकडून सुरू करण्यात आलेली जिजाऊ क्लिनिक योजना आणि नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रे ही प्रकल्पे मुख्यतः सर्वसामान्य नागरिकांना प्राथमिक आरोग्य सुविधा देण्यासाठी कार्यरत असावीत अशी अपेक्षा असते. मात्र, रावेत परिसरातील हे दोन्ही केंद्र गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असले तरी ते केवळ कागदोपत्री सुरू असल्याचे चित्र असून, प्रत्यक्षात नागरिकांना (Jijau Clinic) कोणताही लाभ मिळत नसल्याचे तरस यांनी नमूद केले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, “रोज अनेक नागरिक आणि रुग्ण हे या केंद्रांवर तपासणीसाठी येतात, मात्र पूर्णवेळ डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे त्यांना निराश होऊन परतावे लागते. ही बाब गंभीर असून नागरिकांच्या आरोग्याशी सरळसरळ खेळ केला जात आहे.”
युवा सेनेने महापालिकेला पंधरा दिवसांची मुदत देत स्पष्ट इशारा दिला आहे की, “जर ठराविक कालावधीत पूर्णवेळ डॉक्टर या केंद्रांवर नियुक्त करण्यात (Jijau Clinic) आले नाहीत, तर आम्ही त्या आरोग्य केंद्रांना टाळे ठोकून आंदोलन करू.”
या निवेदनाची प्रत महापालिकेच्या वैद्यकीय विभागात सादर करण्यात आली असून, स्थानिक पातळीवर हा प्रश्न अधिक गंभीर होत चालल्याचे संकेत मिळत आहेत.
राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी देखील या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली असून, आता पालिकेची तात्काळ प्रतिक्रिया आणि कृती काय असते, याकडे सर्वांचे (Jijau Clinic) लक्ष लागले आहे.