Team My pune city –राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मंगळवारी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड करण्यात आली. प्रदेशाध्यक्षपदावरुन पायउतार होत जयंत पाटील यांनी ही सूत्रं शशिकांत शिंदे यांच्याकडे सोपविली.जयंत पाटील यांनी तब्बल सात वर्षे राष्ट्रवादीच्या (NCP) प्रदेशाध्यक्षपदाची (Jayant Patil) जबाबदारी सांभाळली होती.
Dr. Deepak Tilak : ‘केसरी’चे विश्वस्त संपादक आणि ‘टिमवि’चे माजी कुलगुरू डॉ. दीपक टिळक यांचे निधन
समारोपाच्या भाषणात जयंत पाटील (Jayant Patil) हे काहीसे भावनिक झाले. जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या काळात आपण पक्षासाठी किती निष्ठेने आणि एकरुप होऊ काम केले, हे सांगितले. तो म्हणाले, मी गेल्या २५ वर्षांपासून या पक्षात काम करत आहे. शरद पवार यांचा निर्णय मी नेहमीच अंतिम मानला आहे. त्यामुळे त्यांच्यापुढे काही नाही असे म्हणत जयंत पाटील यांनी पक्ष सोडून भाजपत जाणार या चर्चांना विराम देण्याचा प्रयत्न केला. मी जातो आहे, पण सोडत नाही.माझे सगळे सहकारी गेले तरी मी साहेबांसोबत एकनिष्ठ रहाण्याचा निर्णय घेतला. गेल्या ७ वर्षात मी एकदाही सुट्टी घेतली नाही, बायकोलाही ते सांगितलं, असे म्हणताना जयंत पाटील भावुक (Jayant Patil) झाले.
Dehugaon: तब्बल १७ वर्षांनंतर तुकोबांची पालखी आळंदी मार्गे देहूत परतणार
कोण आहेत शशिकांत शिंदे ?
शशिकांत शिंदे यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1963 रोजी झाला असून ते जावळी तालुक्यातील हुमगावचे रहीवासी आहे. त्यांना माथाडी कामगार चळवळीतील प्रभावशाली नेते म्हटले जाते. कॉमर्समध्ये ग्रॅज्युएट असलेले शशिकांत शिंदे हे तरुण वयापासूनच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. शशिकांत शिंदे यांना शरद पवार यांचा अत्यंत विश्वासू साथीदार म्हटले जाते. शशिकांत शिंदे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कोरेगांव विधानसभा मतदार संघात सक्रीय असून ते दोनदा आमदार झालेले आहेत.
प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यातील प्रत्येक प्रश्नांना आणि अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करू. तसेच पक्ष संघटना राज्यात सगळीकडे पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू. या संधीचे १०० टक्के सोने करण्याचा मी प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही शशिकांत शिंदे यांनी (Jayant Patil) दिली.