Team My pune city – हिंजवडी आयटी पार्कसह सात गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यातच जांबे आणि सांगवडे ग्रामपंचायतीकडून महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना पत्र देत आमच्या गावचा महापालिकेत समावेश करावा, अशी थेट मागणी करण्यात आली आहे. तसेच, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही पत्राद्वारे तशीच मागणी करण्यात आली आहे. सातपैकी दोन गावांनी थेट पत्र देवून पिंपरी-चिंचवडमध्ये समावेश करण्यास अनुकूलता दर्शविल्याने ती सर्व गावे समाविष्ट करण्याची मागणी जोर धरत ( Jambe Gram Panchayat) आहे.
Rajgurunagar Bus Stand : राजगुरुनगर बसस्थानकाची दैना ; सर्वत्र चिखलाचे साम्राज्य
महापालिकेत आमचा गाव घ्यावे, असे पत्र जांबे गावच्या सरपंच द्रौपती बाजीराव जगताप आणि सांगवडे गावचे सरपंच रोहन सुनील जगताप यांनी दिले आहे. त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले की, राजीव गांधी इन्फोटेक पार्कमुळे रोजगार आणि व्यावसायिक संधी उपलब्ध झाल्या. त्यामुळे देशभरातून नागरिक आमच्या भागात वास्तव्यास येत आहेत. ही संख्या काही लाखाच्या घरात असून, नागरीकरण वाढले आहे.
आमच्या गावातील अतिशय कमी तसेच, अरुंद रस्ते आहेत. या रस्त्यांमुळे सतत वाहतूक कोंडी, अपघातासह अन्य समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दररोज कचरा उचलण्यासाठी परिपुर्ण यंत्रणा नसल्याने सगळीकडे घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. वारंवार रस्त्याच्या कडेला कचरा पडून राहिलेला असतो. सक्षम ड्रेनेजलाईन यंत्रणा नसल्याने दुर्गंधी व आरोग्यविषयक समस्या उद्भवत आहेत. अनियंत्रित बकालपणामुळे वादविवादाच्या घटनामध्ये वाढ होत असून, यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न भविष्यात निर्माण होऊ ( Jambe Gram Panchayat) शकतो.
Maval: शॉर्टसर्कीटच्या आगीत दोघे गंभीर भाजले, उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू
आमच्या परिसरातील नागरिकांना शुध्द व पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत. नव्याने रस्ते विकसित होत नसून, नवीन उद्याने, दवाखाने, शाळा, आरोग्य विषयक सोयी-सुविधा व इतर गोष्टीची उपलब्धता होत नाही. तसेच, अनेक समस्यांमुळे आयटी पार्कमधील अनेक कंपन्या इतर राज्यामध्ये स्थलांतरीत झाल्याने महाराष्ट्र शासनाच्या हजारो कोटीचा ( Jambe Gram Panchayat) महसूल बुडाला आहे.
यासह दैनंदिन अनेक समस्या व प्रश्न जैसे थे आहेत. अनेक अडचणी, समस्या सोडवणूक करण्यास ग्रामपंचायतीने पाठपुरावा करुनही सुटत नाहीत. भविष्यात देखील ह्या समस्या ग्रामपंचायतीच्या आवाक्याच्या बाहेर गेलेल्या आहेत. त्यावर सक्षम पर्याय म्हणून आमच्या गावाचा महापालिकेत समावेश करावा. गावच्या हद्दीनूसार सुनियोजित, रक्षित व सुंदर असा रहिवाशी भाग विकसित करावा. याबाबत राज्याच्या नगरविकास कार्यालयाशी महापालिकेकडून योग्य तो पत्र व्यवहार करुन आमच्या गावांना समाविष्टकरून घ्यावे, अशी मागणी जांबे, सांगवडे ग्रामपंचायतीकडून करण्यात आली ( Jambe Gram Panchayat) आहे.