Team My Pune City – पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरातील ( Jain boarding land case) जैन बोर्डिंगच्या जमिनीवरून सुरू असलेला वादाच्या प्रकरणाची सुनावणी ३० ऑक्टोबर रोजी धर्मदाय आयुक्तांकडे होणार आहे. या सुनावणीत दोन्ही पक्षांकडून प्रतिज्ञापत्र दाखल केले जाणार असून, त्यानंतर आयुक्त यावर निर्णय देतील.
Eighth Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; आठव्या वेतन आयोगाला हिरवा कंदील
बिल्डरची माघार, समाजाचा ठाम पवित्रा
जैन समाजाच्या तीव्र विरोधानंतर बिल्डर विशाल गोखले यांनी या प्रकल्पातून माघार घेण्याची घोषणा केली होती. धार्मिक भावनांचा आदर राखत त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. मात्र, समाजाने स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत हा करार अधिकृतपणे रद्द होत नाही, तोपर्यंत त्यांचे आंदोलन ( Jain boarding land case)सुरूच राहील.
पुढील घडामोडींवर लक्ष
या प्रकरणामुळे गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील सामाजिक आणि धार्मिक वातावरण ढवळून निघाले आहे. मंदिर आणि वसतिगृहाशी निगडित भावनिक नात्यामुळे जैन समाजाने या व्यवहाराला ठाम विरोध दर्शवला आहे. आता धर्मदाय आयुक्तांचा निकाल या वादाला पूर्णविराम देईल का, याकडे ( Jain boarding land case) सर्वांचे लक्ष लागले आहे.



















