Team My Pune City – जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणावरून ( Jain Boarding Case) राजकीय वातावरण तापले असताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं नाव या वादात विनाकारण ओढलं जात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं की, “हा मुद्दा बिल्डर्स आणि जैन समाजातील आहे. काही जण प्रसिद्धीसाठी मोहोळ यांचं नाव घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, पुण्याची जनता सुज्ञ आहे आणि सर्व घडामोडी पाहत आहे.”
शिंदेसेनेचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी मोहोळ यांच्यावर ( Jain Boarding Case) आरोप केल्यानंतर या प्रकरणाला राजकीय रंग चढला होता. मात्र, फडणवीस यांनी मोहोळ यांना थेट पाठिंबा देत, “जैन समाजाच्या भावना जपल्या जातील आणि त्यांच्याच मनाप्रमाणे निर्णय होईल,” असे आश्वासन दिले.
दरम्यान, या वादग्रस्त प्रकल्पातून गोखले कन्स्ट्रक्शन्सने माघार घेतली आहे. कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विशाल गोखले यांनी सांगितले की, “आम्ही कोणतेही गैरकायदेशीर काम केलेले नाही. मात्र, जैन बांधवांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही या प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.” यामुळे आता या प्रकरणात मोहोळ यांच्यावर केलेले आरोप फोल ठरत असल्याचे भाजपकडून सांगितले जात ( Jain Boarding Case) आहे.


















