Team My pune city –धावत्या कारवर जाधववाडी येथे (Jadhavwadi Accident) क्रेन कोसळली. यामध्ये कार मधील तिघेजण जखमी झाले आहेत. ही घटना एक ऑगस्ट रोजी दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास कारगिल स्टील गोडाऊन समोर घडली.
सचिन राजगोपाल जोशी (28, मोशी), सागर जाधव, लक्ष्मीकांत साकी अशी जखमींची नावे आहेत. जोशी यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार (Jadhavwadi Accident) क्रेन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
PCMC: पिंपरी चिंचवड महापालिकेचे निवारा केंद्र निराधारांसाठी ठरतंय आधार
याबाबत माहिती अशी की, जोशी हे चाकण येथील राजहंस फेरस स्क्रॅप ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत व्यवस्थापक पदावर काम करतात. एक ऑगस्ट रोजी दुपारी ते कंपनीचे संचालक लक्ष्मीकांत साकी आणि अन्य एका कंपनीचे व्यवस्थापक सागर जाधव यांना ईनोवा कार (एमएच 14/जीएच 1818) मधून घेऊन जात होते. जाधववाडी चिखली येथील कारगिल स्टील गोडाऊन समोर आल्यानंतर त्यांच्या कारवर एक क्रेन कोसळले. या अपघातात सागर जाधव हे गंभीर जखमी झाले. तर सचिन जोशी आणि लक्ष्मीकांत साकी यांना किरकोळ दुखापत झाली आहे. जाधव यांच्यावर खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अपघात झाल्यानंतर क्रेनचालक पळून गेला.
Bhaje Leni: भाजे लेणीजवळ दरीत कोसळून तरुणाचा मृत्यू