Team My Pune City – आळंदी येथील फ्रूटवाले धर्मशाळेमध्ये सुवर्ण कलशारोहण ( Indrayani River) कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन देवस्थान व आळंदीकर ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले होते.या निमित्ताने या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती केंद्रीय सहकार व हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर आण्णा मोहळ व डॉ नारायण महाराज जाधव यांची लाभली.
Vadgaon Maval News : वडगावात विद्यार्थी बनले मूर्तिकार
तदपूर्वी केंद्रीय सहकार व हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर आण्णा मोहळ ( Indrayani River) यांनी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेतले.यावेळी श्रींच्या ध्वजाचे पुजन ही त्यांच्या हस्ते करण्यात आले. सुवर्ण कलशारोहण कृतज्ञता सोहळ्या प्रसंगी मोहोळ म्हणाले सुवर्णकलशास समर्पणातून,माऊलींच्या प्रेमाप्रती असलेल्या भावनेतून जी मदत केली, न भूतो ना भविष्यती होती. असा हा संकल्प पूर्ती क्षण सर्व अनुभवत आहे.
Astrological convention : ज्योतिष अधिवेशनात विलास बाफना यांचा सत्कार
माऊलींच्या मंदिरावरती जो २२ किलोच्या सोन्याच्या सुवर्णकलश बसविला गेला. जो ( Indrayani River) त्याचा शिवधनुष्य उचला गेला,तो सर्वांच्या प्रयत्नाने यशस्वी झाला.माहिती दिल्या प्रमाणे देशामध्ये कुठल्या ही मंदिरात इतक्या मोठ्या स्वरूपाचा,वजनाचा सुवर्ण कलश नाही.तो माऊलीं मंदिराला आहे. ही आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे.या वारकरी संप्रदायाचे पाईक म्हणून सर्वजण भक्ती भावाने,प्रेमाने,आत्मतीयेने संकल्प पूर्ती केली.
हे समाधान देणारे आहे.मनानी मनाला जोडलेली माणसे ,त्यातून घडलेले कार्य ( Indrayani River) आहे. माऊली प्रती असलेली निष्ठा, श्रद्धा त्यातून घडलेले कार्य आहे. इंद्रायणी नदीचा शुद्धीकरणाचा प्रकल्प, प्रदूषण मुक्त इंद्रायणी करण्याचा संकल्प हा शंभर टक्के पूर्ण होईल. पंतप्रधान देहूला येऊन जातात,मुख्यमंत्री येथे सात आठ वेळा येथे येऊन गेले.ही संस्कृती परंपरा आपली माणस जपत आहेत.त्यांना तेव्हढीच चिंता आहे. त्यांच्या मना मध्येच तेच विचार व तीच भावना आहे. आमचे देहू,आमची आळंदी परिसरातील इंद्रायणी माता ही स्वच्छ असलीच पाहिजे.
पुणे व त्याचा आजूबाचा परिसर मोठा विस्थारत चालला आहे.कमी दिवसात सर्वांधिक प्रमाणात नागरीकरण होत आहे, लोकसंख्या वाढत आहे.त्या स्वाभीकपणे , त्या अनुषंगाने अनेक नागरिक प्रश्न व वाहतूक प्रश्न निर्माण होत आहे.म्हणून कुठल्याही वाहतुकीचा अडथळा न येता ,सरळ आळंदीला ( Indrayani River) कसे येत येईल असे भाविक विचार करत असतील,तर मेट्रोचे काम पुण्यात चालू आहे. कळस धानुरे मेट्रो डीपीआर मंजूर झाला आहे.पुण्याच्या सर्व बाजूने मेट्रोचे ,पुढच्या काळात विस्तार करणे क्रम प्राप्त आहे. त्यामध्ये आळंदीचा समावेश असणार आहे.देवस्थानचा ज्ञानपीठाचा ही विचार मुख्यमंत्री यांनी जाहीर केला आहे.त्याचा शुभारंभ होईल.
एक लाख व एक लाखाच्या पुढील रक्कम, सुवर्ण दान केलेल्या व्यक्तींना यावेळी श्रींच्या चांदीच्या पादुका भेट देण्यात आल्या. आळंदी नगरपरिषद व आळंदी पोलीस आधिकारी यांनी केलेल्या सहकार्या बाबत त्यांचा सन्मान करण्यात ( Indrayani River) आला.
कृतज्ञता सोहळ्यावेळी श्रींच्या पादुका म्हणून भेट देण्यात याव्यात यासाठी बारा किलो चांदी व श्रींसाठी चांदीची पताका देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ,विश्वस्त राजेंद्र उमाप,विश्वस्त चैतन्य महाराज कबीर,विश्वस्त रोहिणी ताई पवार ,विश्वस्त पुरुषोत्तम महाराज ( Indrayani River) पाटील,व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर,मुख्याधिकारी माधव खांडेकर,वरिष्ठ पोलीस अधिकारी भीमा नरके ,आळंदीकर ग्रामस्थ व नागरिक उपस्थित होते. तसेच आज आळंदी मध्ये भारतीय जनता पार्टीचा नवनियुक्त पदाधिकारी पदवाटपाचा सोहळा पार पडला.