स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे पुरस्कृत ‘इंदिरा अत्रे बालसाहित्य’ पुरस्कारांचे वितरण
Team My Pune City – मुले गोष्टीवेल्हाळ असतात. बालसाहित्याच्या ( Indira Atre Award) माध्यमातून मुलांची फक्त करमणूकच नव्हे तर त्यांना सिद्धांत सांगणे, त्यांच्यावर संस्कार करणे, संदेश देणे आणि त्यांच्यातील जिज्ञासा जागृत करण्याचे कार्य केले जाते. समाजात वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अंगिकार व्हावा, लहान मुलांपर्यंत हा दृष्टीकोन गोष्टीरूपात पोहोचावा या करिता वैज्ञानिक मांडणी असलेल्या पुस्तकांचे महत्त्व मोठे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व इतिहास संशोधक, समीक्षक डॉ. सदानंद मोरे यांनी केले. बालसाहित्यकार इंदिरा अत्रे यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या बालसाहित्य पुरस्कारांची निवड चोखंदळपणे करण्यात आली आहे, या विषयीही त्यांनी कौतुक केले.
स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे पुरस्कृत ‘इंदिरा अत्रे बालसाहित्य’ पुरस्कारांचे वितरण ( Indira Atre Award) आज (दि. २९ ऑगस्ट) डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रम सोमवार पेठेतील दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात झाला. डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशनच्या सचिव डॉ. भारती एम. डी., दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीचे मानद सभासद अभिजित जोग मंचावर होते.
Bhandarkar Institute : भांडारकर स्मृति-पुरस्कार प्रा. के. पद्दय्या यांना जाहीर
डॉ. शंतनू अभ्यंकर यांच्या ‘शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी’ या किशोर-कुमारवयीन ( Indira Atre Award) गटासाठी लिहिलेल्या कादंबरीला, राजीव तांबे यांच्या ‘डेंजरस झिरो ग्राउंड प्लेट’ या बाल साहित्यास, मिलिंद सबनीस लिखित ‘कहानी वंदे मातरम्’ची या पुस्तकाच्या मुखपृष्ठ तसेच पुस्तकातील चित्रांसाठी चंद्रशेखर जोशी यांना तसेच विशेष उल्लेखनीय पुस्तक म्हणून वर्षा चौगुले यांच्या ‘गंमत शब्दांची’ तर संजीवनी बोकील यांच्या ‘गोष्टींतून कबीर’ या पुस्तकास पुरस्कार प्रदान करण्यात आले. ‘शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी’ या पुस्तकासाठीचा पुरस्कार डॉ. रूपाली अभ्यंकर तर ‘गोष्टींतून कबीर’ या पुस्तकासाठीचा पुरस्कार प्रकाशक मधुर बर्वे यांनी स्वीकारला. रोख रक्कम व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीच्या ९९व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
Dehu Road Cantonment : देहूरोड छावणी परिषदेत नागरिकांच्या तक्रारींवर आढावा बैठक
प्रास्ताविकात पुरस्कार संयोजन समिती प्रमुख प्रसाद भडसावळे ( Indira Atre Award) म्हणाले, अधिकाधिक दर्जेदार बालसाहित्य वाचकांपर्यंत जावे या करिता डॉ. प्रभा अत्रे याच्या संकल्पनेतून संस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून या पुरस्कारांचे वितरण केले जाते. ही पुस्तके संस्थेतर्फे खरेदी करून त्यांचे सुयोग्य परिक्षण करून मगच पुरस्कारांसाठी निवड करण्यात येते. पुस्तकाची सजावट व मांडणी करणाऱ्या चित्रकारांना देखील डॉ. प्रभा अत्रे यांच्या संकल्पनेतून पुरस्कार दिला जातो, हे वैशिष्ट्य आहे.
लहान मुले ही देखील समाजघटकच असतात कारण ते उद्याचे सुजाण नागरिक असतात, असे सांगून डॉ. सदानंद मोरे पुढे म्हणाले, इंदिरा अत्रे या बालसाहित्यकार म्हणून प्रसिद्ध असल्या तरी त्यांची लेखनकक्षा रूंद होती. अवघड विषय सोपा करून सांगण्याची त्यांची हतोटी होती. डॉ. प्रभा अत्रे यांनी इंदिरा अत्रे यांच्या नावे बालसाहित्यकार पुरस्कार सुरू करून त्यांचे कायमस्वरूपी स्मारक उभारले आहे. पुरस्कारप्राप्त पुस्तकांच्या माध्यमातून विज्ञान आणि संस्कृती मुलांपर्यंत सहजतेने पोहोचणार आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
बालसाहित्य संमेलने, साहित्य संमेलनात बालसाहित्याचा ( Indira Atre Award) विचार तसेच बालसाहित्याला पुरस्कार यातून बालसाहित्य निर्मितीला प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास डॉ. मोरे यांनी व्यक्त केला.
पुरस्काराला उत्तर देताना राजीव तांबे म्हणाले, इंदिरा अत्रे यांच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराने मला बालज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित झाल्याचे समाधान लाभले आहे.
डॉ. रूपाली अभ्यंकर म्हणाल्या, मुलांना लहानपणापासूनच वैज्ञानिक दृष्टीकोन देण्याचा प्रयत्न पालकांनी करावा. चंद्रशेखर जोशी, वर्षा चौगुले यांनी मनोगत व्यक्त ( Indira Atre Award) केले.