Team MyPuneCity – जपान ,इंग्लंडला मागे टाकत भारत आता जगातील (Indian Economy) चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. नीती आयोगाच्या १० व्या गव्हर्निंग कौन्सिल बैठकीनंतर नीती आयोगाचे सीईओ बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम यांनी हे सांगितले.
ते म्हणाले की , सध्याचे वातावरण भारतासाठी चांगले आहे. देशाची आर्थिक स्थिती मजबूत आहे. “सध्या आपण जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहोत.” आपली अर्थव्यवस्था ४ ट्रिलियन डॉलर्सची आहे.
सुब्रमण्यम यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) मधील डेटाचा हवाला दिला. आयएमएफच्या मते, भारताची अर्थव्यवस्था जपानपेक्षा मोठी झाली आहे. ते पुढे म्हणाले, ‘फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनी हे देश भारताच्या पुढे आहेत. जर आपण योजनेनुसार काम करत राहिलो तर पुढील अडीच ते तीन वर्षांत आपण तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू असे मत त्यांनी यावेळी मांडले (Indian Economy) आहे.
फिच रेटिंग्जने २०२८ पर्यंत भारताच्या सरासरी वार्षिक वाढीच्या क्षमतेचा अंदाज ६.४ टक्के केला आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये रेटिंग एजन्सीने तो ६.२ टक्के असण्याचा अंदाज वर्तवला होता. फिचने त्यांचे पाच वर्षांचे संभाव्य सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) अंदाज अद्ययावत केले आहेत, असे म्हटले आहे की २०२३ च्या अहवालाच्या वेळी भारतीय अर्थव्यवस्था आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मजबूत (Indian Economy) झाली आहे.
या भारताच्या वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे नवीन रोजगार निर्माण होतील. विशेषतः तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा क्षेत्रात युवकांना नोकऱ्या मिळतील. वाढता जीडीपी आणि गुंतवणुकीमुळे पायाभूत सुविधा, आरोग्य आणि शिक्षणात सुधारणा होईल. वाढते उत्पन्न आणि मध्यमवर्गाच्या विस्तारामुळे उपभोग्य वस्तू व सेवांची मागणी वाढून ग्राहकशक्ती वाढेल.