Team My Pune City – 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ( Independence Day)दापोडी, फुगेवाडी व कासारवाडी परिसरात देशभक्तीच्या जल्लोषात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. दापोडी पोलिस स्टेशन, मयूर वाटिका दापोडी तसेच स्थानिक सोसायट्यांमध्ये झेंडावंदन सोहळे पार पडले. यावेळी अधिकारी, पोलीस कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
दापोडी पोलिस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव कोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक संजय काटे, निलेश वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक राजू भास्कर, पंकज महाजन, सुरेश कांबळे, मनोज जासूद, गणेश देशमुख, नवनाथ पवळे, वंदना ठोक, जयदीप सोनवणे, विलास पवार, नितीन संकूनहट्टे यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी ( Independence Day) उपस्थित होते.
Fraud : व्हॉट्सॲपवर खोटे मेसेज पाठवून 15 लाखांची फसवणूक
दरम्यान, मयूर वाटिका दापोडी येथे महावितरणचे कार्यकारी अभियंता सोमनाथ मुंडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता भुजंग बाबर, सहाय्यक अभियंता विश्वास भोसले व अनिल मुलगीर यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. कार्यक्रमाला शुभांगी मुचंडे, केतन मेश्राम, मयूर क्षीरसागर, सायली क्षीरसागर, आसमा शेख यांच्यासह विविध सोसायट्यांचे रहिवासी उपस्थित ( Independence Day)होते.
स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांच्या संकल्पनेतून, मुख्य अभियंता सुनील काकडे व अधीक्षक अभियंता सिंहाजिराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या सोलर रूफ टॉप योजनेविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. नागरिकांना योजनेबाबत जनजागृती करून पर्यावरणपूरक ऊर्जेचा संदेश देण्यात आला.
Nutan Maharashtra Engineering College : नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये ७९ वा स्वातंत्रदिन उत्साहात साजरा
यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने मुख्य आरोग्य निरीक्षक सतीश घोलप, आरोग्य कर्मचारी उद्धव डवरी, आरोग्य मुकादम सिद्धार्थ जगताप, आनंद कांबळे, सविता जाधव, सनी खंडागळे, लक्ष्मीकांत बाराते, जयसिंग काटे, राजू काटे, प्रशांत साळुंखे आदी ( Independence Day) उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. विविध शाळा, संस्था व स्थानिक रहिवाशांनी देखील सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले. देशभक्तीच्या उत्साहात साजरा झालेल्या या स्वातंत्र्यदिनाने परिसरात एकात्मतेचा व देशप्रेमाचा ( Independence Day) संदेश दिला.