Team My Pune City – गणेशोत्सवातील सर्वात मोठा सोहळा ( Immersion procession) म्हणजे विसर्जन मिरवणूक. यंदा ही मिरवणूक वेळेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. दरवर्षी सकाळी साडेदहा वाजता सुरू होणारी विसर्जन मिरवणूक यंदा एक तास आधी म्हणजे सकाळी साडेनऊ वाजता सुरू होणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
पोलिसांच्या नियोजनानुसार मानाचे पाच गणपती दुपारी 12 वाजेपर्यंत बेलबाग चौकात मार्गस्थ होतील, तर दुपारी चारच्या सुमारास श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ मुख्य मिरवणुकीत सहभागी होईल. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास जिलब्या मारुती मंडळ, हुतात्मा बाबू गेनू मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळ आणि अखिल मंडई मंडळही विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतील.
वेळापत्रकानुसार मानाच्या मंडळांची मिरवणूक: ( Immersion procession)
सकाळी ९.३०: पूजा झाल्यानंतर मानाचा पहिला कसबा गणपती मंडळ टिळक पुतळा, मंडई येथे आगमन करून मिरवणुकीचा प्रारंभ.
सकाळी १०.३०: मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती बेलबाग ( Immersion procession) चौकातून मार्गस्थ.
सकाळी ११.००: मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती पूजन-आरतीनंतर मार्गस्थ.
दुपारी १२.००: मानाचे चौथे व पाचवे मंडळ – तुळशीबाग गणपती आणि केसरीवाडा गणपती बेलबाग चौकातून मार्गस्थ.
दुपारी १.००: महापालिका गणपती व त्वष्टा कासार गणपतींचा सहभाग.
दुपारी ४.००: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बेलबाग चौकातून प्रवेश.
सायं. ५.३०: जिलब्या मारुती, हुतात्मा बाबू गेनू, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि अखिल मंडई मंडळांचा सहभाग.
अटी व सूचना: ( Immersion procession)
विसर्जन मार्गावर ढोल-ताशा पथकांना स्थिर वादनास मज्जाव.
प्रत्येक मंडळास जास्तीत जास्त २ पथके (प्रत्येकात ६० सदस्य) परवानगी.
एकाच वेळी दोन पथकांना परवानगी नाही.
मुख्य मिरवणुकीत अंतर ठेवू नये.
अन्य चौकातून प्रवेशास सक्त मनाई.
ढोल-ताशा पथकांना लक्ष्मी रस्त्याने विरुद्ध दिशेने येण्यास मनाई.
रात्री सातनंतर विद्युत रोषणाई व देखावे सादर करणारी मंडळे मिरवणुकीत सहभागी होतील. सर्व मंडळांना वेळ पाळण्याचे निर्देश देण्यात आले असून, यंदाची विसर्जन मिरवणूक शिस्तबद्ध व वेळेत पार पडेल, असा विश्वास पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ( Immersion procession) व्यक्त केला.