Team My Pune City – पुण्यातील माहिती तंत्रज्ञानाचा किल्ला समजल्या जाणाऱ्या हिंजवडी राजीव गांधी आयटी पार्क परिसरातील नागरी समस्यांबाबत ( Hinjewadi IT Park)उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (शुक्रवार) सकाळी लवकर प्रत्यक्ष पाहणी करून महत्त्वाचा आढावा घेतला. नागरिकांच्या वाढत्या तक्रारी, वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठा व कचऱ्याचे व्यवस्थापन यासारख्या विविध मुद्द्यांवर संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.
Lonavala Rain : लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, 24 तासांत 172 मिमी पावसाची नोंद
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडी फेज 1 ते फेज 3 पर्यंत पदाधिकाऱ्यांसह फील्ड इन्स्पेक्शन केले. यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC), पुणे महापालिका, स्मार्ट सिटी प्रकल्प अधिकारी, वाहतूक पोलीस विभाग आणि स्थानिक ( Hinjewadi IT Park) लोकप्रतिनिधी हे उपस्थित होते. त्यांनी स्थानिक नागरिक, आयटी कर्मचाऱ्यांचे अनुभव समजून घेतले. विशेषतः, वाहतूक कोंडी आणि फुटपाथ अतिक्रमणाबाबत तातडीने कृती आराखडा सादर करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या.
Indrayani River : इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ; भक्ती सोपान पुलावरून पाणी
“हिंजवडी हे राज्याच्या आणि देशाच्या आयटी क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र असून येथे काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांची गैरसोय होणार नाही ( Hinjewadi IT Park) यासाठी आपण कटिबद्ध आहोत,” असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले. याशिवाय, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ड्रेनेज आणि जलनिचरा व्यवस्थेचीही पुनर्रचना करण्याचे निर्देश दिले गेले.
या पाहणीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून माहिती देताना लिहिले की, “हिंजवडी परिसरातील नागरी सुविधा सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध असून लवकरच प्रत्यक्ष सुधारणा दिसून ( Hinjewadi IT Park) येतील.”