situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Hinjawadi IT Park : वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ‘पीएमआरडीए’ आता ‘सिंगल पॉईंट को-ऑर्डिनेटर’!

Published On:
Hinjawadi IT Park

  • विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचे आदेश
  • भाजपा आमदार महेश लांडगे यांची महत्त्वपूर्ण बैठक


Team My pune city – हिंजवडी आयटी पार्क ( Hinjawadi IT Park) आणि चाकण- तळेगाव- म्हाळुंगे औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडीचा प्रश्न आणि पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आणि सर्व अस्थापनांमध्ये एकात्म समन्वय करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्रधिकरणाला आता ‘सिंगल पॉईंट को-ऑर्डिनेटर’ म्हणून जबाबदारी देण्यात येईल, असे आदेश पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत.

पुणे, पिंपरी-चिंचवडसह आयटी आणि इंडस्ट्रिअल कॉरिडॉर तसेच रेसिडेन्सिअल कॉरिडॉरमधील वाहतूक कोंडी आणि अन्य प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या मागणीनुसार, विभागीय आयुक्त आणि संबंधित विभागांची बैठक घेण्यात आली. यावेळी औद्योगिक संस्था, संघटना, चाकण असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पुणे जिल्हाधिकारी जितेंद्रजी डुडी यांच्यासह अपर पोलीस आयुक्त, (वाहतूक) पुणे, मुख्य कार्यकारी ( Hinjawadi IT Park) अधिकारी, जिल्हा परिषद पुणे, पोलीस उप आयुक्त (वाहतूक), पिंपरी चिंचवड, मुख्य अभियंता, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे. (PMRDA), मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे. (PWD), मुख्य अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे. (NHAI), मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (रा.मा.), पुणे (NH-PWD), मुख्य अभियंता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC), मुख्य अभियंता, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC), मुख्य अभियंता, मऔविम, पुणे. (MIDC), जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, हवेली उपविभाग, मुख्याधिकारी, तळेगाव/चाकण/आळंदी नगरपरिषद / देहू नगरपंचायतचे संबंधित अधिकाऱ्यांनी आपआपल्या विभागाकडून अपेक्षीत उपायोजनांचे सादरीकरण केले.


बैठकीतील प्रमुख निर्णय व आदेश :
एकात्म समन्वयासाठी PMRDA ला जबाबदारी. 2. भूसंपादनासाठी राज्य सरकारकडून निधीसाठी पाठपुरावा. 3. नाशिक फाटा ते चाकण – 8 लेन महामार्ग कामाला गती 4. तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गासाठी 548 डेव्हलपमेंट प्लॅन (DP) रस्ता 30 मीटर रुंदी. 5. NHAI कडून अतिरिक्त रुंदीकरणाचा प्रस्ताव 6. 205 भूमिपुत्रांचे तात्काळ भूसंपादन व मोबदला 7. चाकण चौकामध्ये इलेक्ट्रिकल टोल शिफ्टिंगचे काम सुरू 8. अंबेठान चौक – ३० दिवसांत पोल शिफ्टिंग पूर्ण करणार. Hinjawadi IT Park) 9. तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्ता – 4 लेन प्रस्ताव, भूसंपादनाच्या कामाला गती 10. 8 दिवसांत खड्डे भराईचे काम सुरू करणार.

11. मोई ते निघोजे – 45 मीटर रुंदीच्या रस्त्याचे काम सुरू करणार. 12. मोई ते चिखली रोड वाइडनिंग आणि पूल बांधणी काम सुरू करण्याची मागणी. 13. महत्त्वाचे चौक विस्तारित करावेत : चाकण असोसिएशनची मागणी (मोशी चौक, आळंदी चौक, गणेश साम्राज्य चौक, आळंदी फाटा चौक, स्पायसर चौक, येळवडी चौक) 14. रस्त्यावर थांबणाऱ्या मोठ्या ट्रक्सवर कठोर कारवाईचे आदेश ( Hinjawadi IT Park)

15. उलट दिशेने किंवा चुकीच्या ठिकाणी पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कारवाईचे आदेश 16. HPCL चौकातील टँकर्सवर वाहतूक नियंत्रणासाठी निर्बंध 17. बहुल व भंडारा डोंगर पायथ्याशी असलेल्या गायरान जागा जिल्हाधिकारी MIDC कडे ताबा देणार. त्याचा वापर ट्रक टर्मिनससाठी होईल. 18. चाकण व हिंजवडीसाठी स्वतंत्र समन्वय समिती (ग्रुप) तयार करण्यात येणार. 19. पुणे जिल्ह्यासाठी ( Hinjawadi IT Park) ‘सारथी’सारखी मोबाईल अ‍ॅप यंत्रणा उभारणार. 20. आळंदी नगरपालिका हद्दीबाहेरील चऱ्होली पूल ते आळंदी रोड यांना जोडणारा 18 मी. रुंदीचा 2 कि.मी. बाह्यवळण रस्ता आणि इंद्रायणी नदीवरील 12 मी. रुंदीचा पुल ‘पीएमआरडीए’ ने विकसित करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
**


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपा महायुती सरकारच्या माध्यमातून हिंजवडी आयटी पार्क,( Hinjawadi IT Park) चाकण औद्योगिक क्षेत्र आणि पुणे-पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागाची ‘कनेटिव्हीटी’ वाढवण्याच्या दृष्टीने प्रशासनाने ‘ॲक्शन प्लॅन’ तयार केला आहे. त्यामुळे आगामी काळात वाहतूक कोंडी आणि समस्यामुक्त पुणे-पिंपरी-चिंचवड परिसर या संकल्पना निश्चितपणे यशस्वी होईल, असा विश्वास वाटतो.

  • महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

Follow Us On

Also Read