Team My Pune City – हिंजवडी आयटी पार्क परिसरात ( Hinjawadi IT Park) गोडरेज प्रॉपर्टीज, व्हीटीपी रिअॅल्टी आणि गेरा डेव्हलपर्स या तीन नामांकित बांधकाम व्यावसायिकांवर अखेर शासकीय यंत्रणांनी दणक्यात कारवाई केली आहे. बांधकाम प्रकल्पांतून उडणारा मलबा, कचरा टाकण्याचे प्रकार तसेच वारंवार घडणारे अपघात यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर संबंधित विभागाने कारवाईचे पाऊल उचलत या बिल्डर्सना नोटिसा बजावल्या आहेत.
Ashtavinayaka : श्रीक्षेत्र अष्टविनायक मंदिर विकास आराखड्यात हेरिटेजचा सन्मान – अजित पवार
हिंजवडी आयटी पार्क हा शहरातील महत्वाचा आयटी हब ( Hinjawadi IT Park) असून दररोज लाखो कर्मचारी आणि नागरिक या परिसरातून प्रवास करतात. मात्र, सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांमुळे रस्त्यावर मलबा पडणे, धुळीचे प्रचंड प्रदूषण होणे आणि सुरक्षा उपायांचा अभाव यामुळे गंभीर अपघात घडत होते. काही अपघातांत नागरिक जखमी देखील झाले आहेत.
Maval : मावळ पर्यटन तालुका घोषित होणार
या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने स्थळ पाहणी ( Hinjawadi IT Park) करत नियमभंग करणाऱ्या बिल्डर्सवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. गोडरेज, व्हीटीपी आणि गेरा या तिन्ही कंपन्यांच्या कामांवर आक्षेप घेण्यात आले असून, बांधकामादरम्यान सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, अशी सक्त सूचना देण्यात आली आहे.
नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सरकारने उचललेले हे पाऊल स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया सामाजिक संघटनांकडून मिळत आहे. मात्र, फक्त नोटिसांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि सातत्यपूर्ण देखरेख केली गेली, तरच परिस्थितीत सुधारणा होईल, अशीही ( Hinjawadi IT Park) नागरिकांची अपेक्षा आहे.