Team My Pune City – हिंजवडी परिसरात नाल्याचा प्रवाह वळवून अनधिकृत बांधकाम करण्यात आले. याप्रकरणी तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pandharpur Wari : मुख्यमंत्र्यांनी घेतले माऊलींच्या पालखीचे दर्शन
जागा मालक शशिकांत साखरे, शालिवाहन साखरे आणि विकसक विठ्ठल मोनाजी तडकेवार अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. हरिष आंगद माने (वय 35, रा. म्हेत्रेवाडी, चिखली) यांनी शुक्रवारी (दि. 4) याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Pavana Dam : पवना धरणातून 400 क्युसेक्स विसर्ग सुरू; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओढ्या नाल्याची दिशा बदलून त्याठिकाणी संरचनात्मक काम करीत लोकांच्या जीवितास धोका निर्माण करण्यात आला. जलप्रदूषण कायदा व पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. हिंजवडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.