Team My Pune City – माण गावातील पॉवर हाऊस चौकाजवळील लेबर कॅम्प येथे एका महिलेवर गावठी हातभट्टीची दारू विक्री प्रकरणी ( Hinjawadi Crime News) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.17 जुलै) दुपारी करण्यात आली.
या प्रकरणात पोलिस कॉन्स्टेबल मितेश यादव यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात ( Hinjawadi Crime News) फिर्याद दिली आहे. एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला गावठी हातभट्टीची तयार दारू विक्रीसाठी अनधिकृतपणे, विनापरवाना, बेकायदेशीररित्या बाळगून विक्री करत होती. कारवाईसाठी आलेल्या पोलिसांची चाहूल लागताच महिला पळून गेली. तिच्या ताब्यातून 7 हजार 400 रुपये किमतीची 74 लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस ( Hinjawadi Crime News) तपास करत आहेत.