Team My Pune City – गेल्या दोन दिवसांपासून खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि पवना धरण परिसरात 150 ते 180 मि.मी. इतका मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाल्याने धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात येव्या वाढल्या आहेत. त्यामुळे आज मंगळवारी (दि. 19) सकाळपासून चारही धरणांतून टप्प्याटप्प्याने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नागरिकांनी नदीपात्राच्या परिसरात जाऊ नये, सतर्क राहावे, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
Pune: पुणे जिल्ह्यातील प्रमुख धरणे शंभर टक्के भरली; भीमा-नीरा नदीपात्रात विसर्ग सुरू
खडकवासला धरणातून आज (मंगळवार) सकाळी 8 वाजता 2 हजार 178 क्युसेक्सने आणि सकाळी 9 वाजता 4 हजार 170 क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला असून तो वाढत जाऊन 10 हजार क्युसेक्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पानशेत धरणातून सकाळी 8 वाजता 3 हजार 996 क्युसेक्स, वरसगाव धरणातून सकाळी 8 वाजता 3909 क्युसेक्स आणि पवना धरणातून सकाळी 9 वाजता 2 हजार 860 क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात आला (Heavy Rain) आहे.
Pavana Dam Alert : पवना धरणातून विसर्ग वाढणार; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस होत असल्याने विसर्गाचे प्रमाण वेळोवेळी (Heavy Rain) वाढविण्यात अथवा कमी करण्यात येऊ शकते, अशी नोंद मध्यवर्ती पुरनियंत्रण कक्षाने घेतली आहे. पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, अशी प्रशासनाची सूचना आहे.
नदीपात्रात असलेली जनावरे, वाहने अथवा इतर साहित्य तातडीने हलविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच संबंधित विभागांनी व स्थानिक प्रशासनाने तात्काळ सतर्कतेची पावले उचलावीत, असे संनियंत्रण अधिकारी श्वेता यो. कुहाडे यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात (Heavy Rain) आले आहे.