situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Heavy Rain : मुसळधार पावसामुळे पुण्यात हवाई व रस्ते वाहतूक विस्कळीत, प्रवाशांना फटका 

Published On:
Heavy rain

Team My Pune –  पुणे शहरात दोन दिवसापासून ( Heavy Rain) झालेल्या मुसळधार पावसाने पुण्यातील हवाई वाहतूक व रस्ते वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली. त्यामुळे शेकडो प्रवाशांना गैरसोय सहन करावी लागली. खराब हवामान, दृश्यमानता कमी होणे आणि रस्त्यांवरील वाहतूककोंडी यामुळे प्रवाशांचे वेळापत्रक बिघडले.

Rain Alert : पावसामुळे उद्भवणारी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे – आयुक्त शेखर सिंह

हवाई वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण झाला. दिल्लीहून पुण्याकडे येणारे इंडिगोचे विमान (6E-5387) दुपारी 1.20 वाजता पुण्यात उतरणार होते. ( Heavy Rain) मात्र, दृष्यमानता कमी झाल्याने हे विमान हैदराबादला वळवावे लागले. याशिवाय, पुणे विमानतळावरून सुटणाऱ्या तीन विमानांना देखील मोठा विलंब झाला. यात इंडिगोची पुणे- दिल्ली सेवा (6E-2285) ही नियोजित वेळेपेक्षा तब्बल दोन तास उशिराने म्हणजे दुपारी 2.05 ऐवजी 4.35 वाजता रवाना झाली. पुणे- जळगाव (IC-5606) हे विमान दुपारी 3.55 ऐवजी 5.40 वाजता सुटले, तर स्पाईसजेटची पुणे-जयपूर सेवा (SG-1080) सायं. 5.30 वाजता सुटणे अपेक्षित होते, पण ती उशिरा रात्री प्रवासाला निघाली.

Lonavala Rain : लोणावळ्यात मुसळधार पाऊस; पुढील ४८ तास रेड अलर्ट

रस्ते वाहतुकीवरही पावसाचा मोठा परिणाम झाला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) शिवनेरी बस सेवा मुंबई-पुणे मार्गावर पाणी साचल्याने व वाहतूककोंडीमुळे विस्कळीत झाल्या. मुंबईहून स्वारगेटकडे येणाऱ्या बसांना जवळपास एका तासाचा उशीर झाला. तसेच पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर दिवसभर वाहनांची ( Heavy Rain) गती मंदावलेली होती.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाने मात्र गाड्यांच्या वेळापत्रकावर पावसाचा परिणाम झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू होती.

पावसामुळे उड्डाणे व बससेवा उशिरा धावल्याने विमानतळ व बसस्थानकांवर प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. वारंवार पावसामुळे पुण्यातील वाहतूक व्यवस्था ठप्प होते, हे पुन्हा एकदा ( Heavy Rain) स्पष्ट झाले आहे.

Follow Us On