Team My Pune City – पुणे रेल्वे विभागात हडपसर स्थानकावर ( Hadapsar Railway Station)उभारण्यात येत असलेल्या सॅटेलाइट टर्मिनलसाठीचे नॉन-इंटरलॉकिंग (NI) काम केवळ 16 तास 30 मिनिटांत पूर्ण करण्यात आले असून, हे काम नियोजित वेळेपेक्षा तब्बल 30 मिनिटे आधी पूर्ण होणे ही प्रशासनाची मोठी उपलब्धी मानली जात आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.
या कामाचा उद्देश हडपसर स्टेशनच्या पायाभूत सुविधा आणि रेल्वे ट्रॅफिक व्यवस्थापनाच्या दृष्टीने सशक्त पायाभूत आधारभूत व्यवस्था उभारणे हा होता. यार्ड रीमॉडेलिंग, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (EI) प्रणालीचे यशस्वी कमिशनिंग आणि 12 मीटर रुंद फूटओव्हर ब्रिजसाठी 11 गर्डरचे यशस्वी लाँचिंग ही या प्रकल्पातील मुख्य वैशिष्ट्ये ( Hadapsar Railway Station) होती.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी 210 कामगार, वेल्डिंग व ब्लॅकस्मिथच्या तज्ज्ञ टीम्स, आणि JCB, पोकलेन, हायड्रा, डंपर व 500 टन क्षमतेच्या दोन क्रेन्स यांसारखी यंत्रसामग्री ( Hadapsar Railway Station) वापरण्यात आली.
सिग्नल व दूरसंचार विभागाचे कौतुकास्पद योगदान
Kyosan कंपनीच्या K5D प्रणालीच्या आधारे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. यामध्ये 88 मार्गांचे कॉन्फिगरेशन, ड्युअल व्हिडीयू हॉट स्टँडबाय मोड, 16 मुख्य सिग्नल्स, 20 पॉइंट्सचे वायरिंग, 47 DC ट्रॅक सर्किट्स, Frauscher MSDAC डिटेक्शन, तसेच RDSO मान्यताप्राप्त सायबर सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश ( Hadapsar Railway Station) आहे.
दोन नवीन लूप लाईन्स कार्यान्वित
या प्रकल्पाद्वारे दोन नवीन लूप लाईन्स उपलब्ध करून देण्यात आल्या असून, जुन्या लूप लाईन्सचेही लांबीवाढीचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे पुणे जंक्शनवरील रेल्वे ट्रॅफिकचा भार कमी होण्यास मदत होणार ( Hadapsar Railway Station) आहे.
TRD विभागाने तीन प्लॅटफॉर्म लाईन्सवर ओव्हरहेड इलेक्ट्रिफिकेशन (OHE) चे काम केले. तसेच दोन स्टॅबलींग लाईन्स, एक क्रॉसओव्हरचे कमिशनिंग व FOB आणि COP लाँचिंगसाठी आवश्यक त्या बदलांची पूर्तता केली. हे काम 125 कुशल कर्मचाऱ्यांच्या सहभागाने पार पडले.
हा प्रकल्प नियोजित वेळेआधी पूर्ण करून, पुणे रेल्वे विभागाने प्रवासी सुविधांवरील आपली बांधिलकी व संवेदनशीलता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. हडपसर सॅटेलाइट टर्मिनल हा पुणे रेल्वे नेटवर्कसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, यामुळे भविष्यातील वाहतूक सुरळीत ( Hadapsar Railway Station) होण्यास मोठी मदत होणार आहे.