Team My Pune City –कोल्हापूर अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सच्या ( Hadapsar Crime News)कारवाईत हडपसर परिसरात मेफेड्रोन (एम.डी.) या सिंथेटिक अंमली पदार्थाची विक्री व वाहतूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी एका महिलेसह एका तृतीयपंथीयास व एका पुरुषाला अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून एकूण ₹४४ लाख ३१ हजार ९५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Rashi Bhavishya 30 Oct 2025 – कसा जाईल आपला आजचा दिवस?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी टास्क फोर्सच्या पथकाने हडपसर, वानवडी व कळेपाडळ परिसरात गस्त सुरू असताना, मंजरी ते चौक क्र.१५ रोडवरील इंदेन गॅस एजन्सीसमोर एक महिला व तृतीयपंथीय व्यक्ती दुचाकीवर संशयास्पद हालचाल करताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवून तपासणी केली असता, त्यांच्या ताब्यातून ६० ग्रॅम आणि ८ मिलीलीटर मेफेड्रोन (एम.डी.), दोन मोबाईल फोन, वजनकाटा व दुचाकी असा एकूण ₹३१ हजार ९५० रुपये किमतीचा माल ( Hadapsar Crime News) आढळला.
Dehu Road Burglary : देहूरोडमध्ये घरफोडी; सोने-रोख रक्कम लंपास
या कारवाईत पोलिसांनी मेघा दीपक जगताप (वय २७, रा. महादेवनगर, हडपसर) व स्नेहल उर्फ गणेश शिवसंच (वय २१, रा. ससानेनगर रोड, हडपसर) या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत मेघाने अंमली पदार्थ सलमान सलीम शेख (रा. घोरपडे पेठ) याच्याकडून घेतल्याची कबुली दिली. त्यानंतर सलमान शेखलाही पोलिसांनी अटक केली.
या तिघांविरुद्ध अंमली पदार्थ नियंत्रण व मानसप्रभावी द्रव्ये (NDPS) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास हडपसर पोलीस ठाण्यात सुरू( Hadapsar Crime News)आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली, अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स, कोल्हापूर अॅक्शन डिव्हिजनच्या पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात सरोजिनी चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक माधवनंद ढोत्रे व अन्य कर्मचारी सहभागी होते.
पोलिसांकडून या अंमली पदार्थाचा पुरवठा साखळी व इतर संबंधित व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू असून, या कारवाईमुळे पुण्यातील अंमली पदार्थ तस्करांमध्ये एकच खळबळ उडाली ( Hadapsar Crime News) आहे.



















