situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

H. A. Primary School : एच. ए‌. प्राथमिक शाळेत रंगला माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

Published On:

Team MyPuneCity – एच. ए. प्राथमिक शाळेत १९७५ साली बालवाडीमध्ये प्रवेश घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेत येऊन सुवर्ण महोत्सवी शाळेतील पहिले पाऊल व नवागतांचे स्वागत केले. हा दुग्ध शर्करा योग असलेला कार्यक्रम नुकताच शाळेच्या ‘ रजत भवन ‘ मध्ये संपन्न झाला .

शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा जाधव , ज्येष्ठ शिक्षिका अर्चना गोरे , शहनाज हेब्बाळकर , श्यामला दाभाडे , धनश्री पवार यांनी आलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे औक्षण केले . बालवर्गाच्या विद्यार्थ्यांनी गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले .

Amit Gorkhe:भाजपचे आमदार अमित गोरखे यांची महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ‘तालिका सभापती’ पदी निवड

व्यासपीठावर मोहन बाबर ,सुरेंद्र मोरे , मंदा कंद , शीला बडदाळ , उमेश कुलकर्णी , अभय पिंपळीकर , पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार तांबे , प्रकाश तेलंगी , सुधीर भोसले, ॲड मनीषा गवळी , सविता पवार उपस्थित होते. कार्यक्रमात सरस्वती पूजन , दिप प्रज्वलन , ईशस्तवन ,स्वागत गीत व बालगीते सादर करण्यात आली.

शाळेच्या शिक्षिका समीक्षा ईसवे, अनिता येनगुल ,अनघा कडू, सीमा हांगे ,रत्नाकर वरवडेकर, विठ्ठल मोरे यांनी गायन व वादन केले. सर्व माजी विद्यार्थी स्वागताने व एकमेकांच्या भेटीने भारावून गेलेले होते. बाहेर गावावरून आलेले अनेक विद्यार्थी हे सन १९८७ मध्ये दहावी झाल्यानंतर बऱ्याच वर्षांनी एकमेकांना भेटत होते .शालेय जीवनातील आठवणींना प्रत्येकाला उजाळा द्यायचा होता .सर्वजण बालपणीच्या आठवणीत रममाण झालेले होते .

Talegaon Dabhade : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांसोबतच पालकांनीही पुढाकार घेतला पाहिजे – सोनबा गोपाळे

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन बाबर यांनी केले .माननीय मुख्याध्यापिका सुरेखा जाधव यांनी शुभेच्छा दिल्या .माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एकनाथ बुरसे उपमुख्याध्यापिका आशा माने पर्यवेक्षिका अनिता कदम यांच्या वतीने राजू गायकवाड व नायडू सरांनी सन्मान स्वीकारला. माजी विद्यार्थ्यांनी बालवर्गाच्या २०० विद्यार्थ्यांना मण्यांच्या पाट्यांचे वाटप केले. तसेच सर्व मुलांना चॉकलेट दिले.

शैलेश भावसार यांनी गाणी गायली व राजेश चिट्टे यांनी मिकी माऊसचा ड्रेस घालून डान्स केला सर्व लहान मुलांनी व माजी विद्यार्थ्यांनी या गाण्याचा आनंद घेतला . दिलीप कंद , माजी सैनिक सुनील पवार व दिनेश मानकर यांनी मनोगते व्यक्त केली डेक्कन एज्युकेशन संस्था , एच ए शाळा , एच ए कंपनी व विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शाळेच्या माजी मुख्याध्यापिका शकुंतला ढवळीकर तसेच शिक्षक , सेवक , आया मावशी या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली .

शाळेची अशीच प्रगती होत राहावी व पुन्हा पुन्हा आम्हाला शाळेत भेटण्याची संधी मिळावी अशा भावना सर्वांनी व्यक्त केल्या व पुन्हा लवकरच भेटूयात या आश्वासनाने मेळाव्याची सांगता झाली. आभार अजित गुजराथी यांनी मानले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक डॉक्टर विठ्ठल मोरे यांनी केले.

Follow Us On