Team My Pune City – अग्रवाल मारवाडी ( GST)चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड एज्युकेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश अग्रवाल यांनी अलीकडेच जाहीर करण्यात आलेल्या जीएसटी सुधारणांचे स्वागत करताना सांगितले की, हा निर्णय केवळ उद्योग-व्यापार क्षेत्रासाठीच नव्हे तर सामान्य जनतेसाठीही मोठा दिलासा घेऊन आला आहे.
अग्रवाल म्हणाले की, चेंबरकडून अनेक वर्षांपासून ( GST)सिमेंट व स्टीलवरील जीएसटी कमी करण्याची मागणी होत होती. सरकारच्या या निर्णयामुळे घर बांधण्याचा खर्च कमी होईल आणि सामान्य नागरिकाचे स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न साकार होईल.
ते पुढे म्हणाले की, आरोग्यसेवा व विमा पॉलिसींव( GST)रील जीएसटी रद्द करणे हे समाजासाठी ऐतिहासिक पाऊल आहे. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळेल व सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होईल.
याशिवाय, ऑटोमोबाईल निर्यातीला या सुधारणांमुळे थेट लाभ होणार असून सोप्या कर रचनेमुळे भारतीय ऑटोमोबाईल उद्योग जागतिक बाजारपेठेत( GST) अधिक स्पर्धात्मक ठरेल. त्यामुळे निर्यातीला चालना मिळेल आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेला मजबुती मिळेल.
भविष्याचा विचार करताना श्री अग्रवाल म्हणाले –“आगामी काळात केवळ दोनच जीएसटी स्लॅब – 5% व 12% असावेत, ही आमची ठाम ( GST) मागणी आहे. त्यामुळे कर प्रणाली सुलभ होईल, महागाईवर नियंत्रण येईल व उद्योग-व्यापार क्षेत्रात स्थैर्य येईल.”
या प्रसंगी संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी नरेंद्र गोयल, कमलराज बंसल, विनोदराज साकला, उमेश मांडोत तसेच इतर सदस्यांनीही जीएसटी सुधारांचे स्वागत केले व हा ( GST) निर्णय भारतीय उद्योग, व्यापार आणि समाज – तिन्ही क्षेत्रांसाठी दूरगामी लाभदायी ठरेल असे मत व्यक्त केले – राजेश अग्रवाल,राष्ट्रीय अध्यक्ष.