Team My Pune City –काही दिवसांपूर्वी पुण्यातील सिंहगड रोडवर गौतमी पाटील (Gautami Patil)यांच्या गाडीने एका रिक्षाला मागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली होती. या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला होता. विशेष म्हणजे, अपघाताच्या वेळी गौतमी पाटील गाडीत नव्हती , मात्र गाडी तिची होती. अपघातानंतर गाडीचालक घटनास्थळावर न थांबता निघून गेला होता, ज्यामुळे रिक्षाचालकाच्या कुटुंबाकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. संबंधित रिक्षा चालकाच्या मुलीने गौतमी पाटीलवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर ची भेट झाल्यानंतर तिने गौतम पाटीलचे आभार मानले.
याबाबत रिक्षा चालकाची मुलगी अपर्णा मरगळे म्हणाली ,आम्ही जे काही आरोप केले होते त्याचे आम्हाला पुरावे मीळत नव्हते. आता मला पोलीस प्रशासानाने सर्व पुरावे दिले आहेत.
Pune: भरतनाट्यम् नृत्याविष्कारातून साकारले गीत रामायण
Sunil Shelke : सामाजिक उपक्रमांतून रोटरी सिटीचे काम कौतुकास्पद-आमदार सुनिल शेळके

अपर्णा पुढे म्हणाली ,गौतमी पाटील जरी भेटायला आल्या तरी कायदेशीर प्रक्रीया सुरू राहील. कोर्टात केस लढली जाईल. गौतमी पाटीलकडून मी कोणतीही मदत घेतली नाही. माणुसकी म्हणुन गौतमी पाटील आम्हला भेटायला काल त्या आल्या होत्या. वेगवेगळ्या लोकांनी त्यांच्याकडून पैसे काढायचा प्रयत्न केला आशी त्यांनी माहीती दिली.
आम्ही कोणतीही १० लाख, १५ लाख रूपयाची मागणी केली नाही. गौतमी पाटील यांनी आम्हाला कधीही मदत लागली तर ती द्यायला तयार आहे आसे सांगितले. परंतु आता तरी मी सध्या समर्थ आहे माझ्या वडिलांची काळजी घ्यायला. गौतमी पाटील यांनी आमची हालहवाल माहिती घ्यावी हिच इच्छा होती. त्या आल्या त्यांनी भेट घेतली आहे.