Team My Pune City – सर्वोच्च न्यायालय, केंद्रीय प्रदूषण ( Ganeshotsav) नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ (पी.ओ.पी.) श्री गणेश मूर्तीची विक्री करताना विक्रेत्यांना त्याची नोंद ठेवणे आणि मूर्तीच्या मागील बाजूस स्पष्टपणे दिसेल अशा स्वरुपात ऑईल पेंटने लाल रंगाचे गोलाकार चिन्ह करणे बंधनकारक राहणार आहे. महापालिकेनेही गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करावा, असे आवाहन केले आहे.
Heavy Rain : मुसळधार पावसामुळे पुण्यात हवाई व रस्ते वाहतूक विस्कळीत, प्रवाशांना फटका
महापालिकेच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक ( Ganeshotsav) पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘पीओपी’च्या मूर्तीची विक्री करताना आवश्यक मार्गदर्शक सूचनांचे पत्रक महापालिका प्रशासनाने तयार केले आहे. त्यानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत.
Lonavala Rain : लोणावळ्यात मुसळधार पाऊस; पुढील ४८ तास रेड अलर्ट
“पीओपी’च्या सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्तीचे केवळ कृत्रिम तलावातच ( Ganeshotsav) विसर्जित करावे, सार्वजनिक मंडळाच्या मोठ्या मूर्तीऐवजी प्रतीकात्मक स्वरुपात लहान मूर्तीचे विसर्जन करावे, सहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी इतर कोणताही पर्याय उपलब्ध नसेल, तर ती मूर्ती नैसर्गिक जलस्रोतात विसर्जित करावी. मात्र, ही मूर्ती शाडू माती, चिकणमातीची असावी,’ या सूचना करण्यात आल्या आहेत.
‘गणेश मूर्तीचे दागिने बनविण्यासाठी वाळलेली फुले, पेंढा यांचा वापर करावा आणि मूर्ती आकर्षक बनविण्यासाठी झाडांची नैसर्गिक उत्पादने रेझीन्सचा चमकदार सामग्री वापरावी. मूर्ती रंगविण्यासाठी पर्यावरणास अनुकूल रंग, जैव विघटनशील आणि बिनविषारी नैसर्गिक रंगाचा वापर करावा, नैसर्गिक साहित्य आणि रंग वापरून बनवलेले व काढता येण्याजोगे आणि धुण्यायोग्य सजावटीचे कपडे वापरावेत,’ असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले ( Ganeshotsav) आहे.